आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिड हल्ल्याच्या राखेतून घेतली फीनिक्स भरारी, “छपाक”ने दिली चेहरा न झाकण्याची प्रेरणा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मत्सराच्या विध्वंसक मानसिकतेच्या अॅसिड हल्ल्यातून जिद्दीने उभ्या राहिलेल्या अर्चना शिंदे यांची कहाणी...

मंकेश माळी

वाशीम - पोलिस होण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी तिने सराव सुरू केला. पोलिस भरतीचा कॉलही आला. पण, त्याला हजेेरी लावण्याऐवजी प्रेमाने तिचा घात केला. पहाटे सरावासाठी मैदानात जात असतानाच प्रेमाच्या आणाभाका घालणाऱ्यानेच तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले आणि तिच्या आयुष्याचा चेहराच बदलून गेला. कारण काय तर, पोलिस बनण्याच्या स्वप्नापायी तिने त्याच्या प्रेमाला दिलेला नकार. त्याची शिक्षा भोगत गेल्या १७ वर्षांपासून जळालेल्या चेहऱ्याला रुमाल गुंडाळू त्या जगत होत्या. ‘छपाक’बघितला आणि दुसऱ्या कुणावर अशी वेळ येऊ नये म्हणून चेहऱ्याचा रुमाल सोडून त्या निर्धाराने कामाला लागल्या.
ही कहाणी आहे अर्चना रंगनाथ शिंदे यांची. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी पोलिस सेवेत जाण्याची तयारी सुरू केली होती. वडिलांना अार्थिक मदत म्हणून स्थानिक वृत्तवाहिनीत निवेदिकेचे कामही सुरू केले होते. नियोजनानुसार सारे काही घडत होते. बी. ए. च्या द्वितीय वर्षात असताना २००२ मध्ये तिला पोलिस भरतीचा कॉलही आला. रोज मैदानावर ती सराव करू लागली. तिथेच तिला एक सोबती मिळाला. परिचयानंतर त्याने अर्चनावर प्रेम असल्याचे व्यक्त केले. पोलिस बनण्याचं स्वप्न असल्याने तिनं नम्रपणे नकार दिला. प्रेमाची जागा मत्सराने घेतली. त्याने जीवघेणा डाव रचला. त्याने अर्चनाच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. एक डोळा आणि एक कान त्याचवेळी गळून गेला. चेहरा विद्रुप झाला. सात महिने अर्चना रुग्णालयात मृत्यूशी झुंजत होती. शारीरिक, मानसिक आघात सहन करत होती. आत्महत्येचाही विचार येऊन गेला, पण आई-वडिलांच्या साथीनं तो मागे सरला. स्वत:चे दुकान सुरू केले. चेहऱ्याला रुमाल बांधून घरोघरी फिरून स्वत:चा व्यवसाय वाढवला.जिद्दीची कहाणी

> उद्ध्वस्त आयुष्यातून स्वत:च सावरले {वर्दीच्या ऐवजी अॅसिड हल्ला आला वाट्याला {पोलिस बनण्याचं स्वप्न धुळीला, जगण्याचा संघर्ष {आई-वडिलांची साथ बनली मोलाची


> अॅसिड हल्ल्यानंतरही स्वावलंबन जपले {चेहरा झाकला पण किराणा दुकान सुरू केले


> ‘छपाक'ने दिली प्रेरणा, १७ वर्षांनी रुमाल सोडला


> अन्याय पीडितांसाठी काम करण्याचा संकल्प