आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Women's Day Special | Women Will Not Have To Give Entry Fee At ASI Protected Heritage Sites On International Women's Day

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जागतिक वारसा स्थळांमध्ये महिलांना मोफत प्रवेश, केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची घोषणा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजिंठा-वेरूळ लेणी, लाल किल्ला, कुतुबमिनार, ताजमहल, कोणार्क सूर्य मंदिर इत्यादी ठिकाणी महिलांना मिळणार मोफत प्रवेश

नवी दिल्ली - भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने संरक्षित केलेल्या सर्व वारसा स्थळांवर उद्या (8 मार्च) महिलांना प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही, अशी घोषणा केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी शनिवारी केली. यामध्ये लाल किल्ला आणि ताजमहल यांसारख्या स्थळांचा समावेश असणार आहे. या ठिकाणी महिलांना ने-आण करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे. 
यासोबतच या जागतिक वारसा स्थळांवर मुलांना स्तनपान आणि त्यांची देखभाल करण्यासाठी विशेष कक्ष तयार केले जाणार आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील.   केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेत समाविष्ट असलेले मुख्य स्थळे 


भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या मुख्यालयाने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. केंद्रीय मंत्री पटले म्हणाले की, ''ऐतिहासिक स्थळांवर मोफत प्रवेश देऊन आम्ही महिलांचा सन्मान करीत आहोत. 'हर काम देश के नाम' असा आमचा नारा आहे. या स्थळांमध्ये लाल किल्ला, कुतुबमिनार, हुमायू मकबरा, ताजमहल, कोणार्क सूर्यमंदिर, मल्लपुरम, अजिंठा-वेरूळ लेणी, खजुराहो येथील मंदिरे समाविष्ट करण्यात आली आहेत.''

बातम्या आणखी आहेत...