आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार अपघातात महिला मृत्यूंचे प्रमाण पुरुषांपेक्षा 73% जास्त,व्हर्जिनिया विद्यापीठाचा अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क-कार अपघातात मरण पावणाऱ्यांत चालक पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण ७३ % जास्त असते. यामागचे सर्वात मोठे कारण आहे की, कारमधील सुरक्षा सुविधा देताना महिलांचा फारसा विचार न करता ते डिझाइन केलेले असतात. एवढेच नव्हे तर क्रॅश चाचणीवेळी चालक म्हणून ठेवण्यात येणारी डमी सरासरी पुरुषांच्या उंचीची असते. २००३ मध्ये अमेरिकेत या मुद्द्यावरून गदारोळ झाला तेव्हा काही कंपन्यांनी ४९ किलोच्या डमीचा वापर सुरू केला. मात्र तो फार काळ चालला नाही. सीट बेल्टची आखणीदेखील पुरुषांना विचारात घेऊन होत असते. व्हर्जिनिया विद्यापीठातील काही अध्यापकांनी हे संशोधन केले आहे. यात यूएसए टुडेच्या एका अहवालाचाही हवाला देण्यात आला आहे. यानुसार, महिलांची उंची पुरुषांपेक्षा कमी असते त्यामुळे सीट बेल्ट सोयीस्करपणे अॅडजस्ट होत नाही. बेल्टचा खालील भाग काम करतो, मात्र त्याचा वरील भाग क्रॅशच्या वेळी महिलांच्या गळ्यात अडकतो. एअरबॅग न उघडल्याच्या स्थितीत महिलांना होणारी गंभीर दुखापत मृत्यूस कारणीभूत ठरते. अमेरिकेतील काही राज्यांत कार अपघातात मरणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे. 


एका अभ्यासानुसार, काही कंपन्या मोजक्या देशातच क्रॅश टेस्टमध्ये महिलांच्या डमीचा वापर करतात. यात क्रॅश टेस्टच्या वेळी सीट बेल्ट डमीच्या खाद्यात किंवा गळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले. एवढे असूनही महिलांच्या दृष्टीने सुरक्षाविषयक फीचर्स तयार झाले नाहीत. स्वीडन, नॉर्वे आणि आयर्लंडसारखे देश मात्र याबाबत गंभीर आहेत. 

 

सीट बेल्टला तरी अॅडजस्टेबल करता येऊ शकेल
व्हर्जिनिया विद्यापीठातील शास्त्रज्ञ जेसन फॉरमन यांनी सांगितले, कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्या अशा सुरक्षाविषयक सुविधांबाबत गंभीरपणे विचार करताना दिसत नाहीत. कारमधील सुरक्षाविषयक उपाययोजना महिलांच्या दृष्टीने तयार केल्या गेल्या असत्या तर महिलांचे मृत्यू कमी झाले असते. आता किमान सीट बेल्ट आणि सीट अॅडजस्टेबल असावे, एवढे तरी होऊ शकते. यासाठी कंपन्यांना फार खर्चही येणार नाही. शिवाय यामुळे अनेकांचे प्राणही वाचू शकतील.