आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांचा मंदिर गाभाऱ्यात प्रवेश, तुळजाभवानी देवीला चरणस्पर्श; प्रथा मोडल्याचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर- तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करून तुळजापुरातील काही महिलांनी देवीचे चरणस्पर्श करत जुनी प्रथा माेडल्याचा दावा केला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी प्रक्षाळ पूजेनंतर घडला. दरम्यान, मंदिर संस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी मात्र दोन पुजारी वर्गातील मतभेदांतून हा प्रकार घडल्याचे सांगून भाष्य टाळले. तुळजापुरात पाळीकर व भोपे अशा दोन पुजारी गटात वाद आहे. भोपे पुजारी वर्गातील महिलांव्यतिरिक्त इतर महिलांना मूर्तीला स्पर्श करण्याचा अधिकार नाही, असे सांगितले जाते. मात्र, लेखी सूचना नसल्याने प्रथा मोडली असे म्हणता येणार नाही, असे पाळीकर पुजाऱ्यांना वाटते.

 

तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करून तुळजापुरातील काही महिलांनी तुळजाभवानी मातेचे चरणस्पर्श दर्शन घेतले. त्यानंतर महिलांनी प्रथा मोडल्याचा दावा करीत मंदिर परिसरात जल्लोष केला. हा प्रकार शनिवारी (दि.५) सायंकाळी प्रक्षाळ पूजेनंतर घडला. त्यामुळे घटनेने खळबळ उडाली. दरम्यान या प्रकाराबाबत मंदिर संस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी मात्र हा दोन पुजारी वर्गातील इश्यू असल्याचे सांगून प्रतिक्रिया देणे टाळले. 

तुळजाभवानी मातेचे मंदिर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काही महिलांनी तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश करीत चरणस्पर्श करून दर्शन घेतले. यामध्ये अॅड. मंजुषा मगर, विभावरी गंगणे, वासंती जगताप आदी २० ते २५ महिलांचा समावेश होता.

 

दरम्यान याप्रकरणात मंदिर संस्थानने कोणत्याही महिलांना देवीचे चरण स्पर्श घेण्यापासून रोखले नाही. तसेच संबंधितांना विचारणा केेली नाही. मात्र, ज्या गटातील महिलांनी देवीचे चरणस्पर्श घेतले त्यांच्या गटाने मात्र देवीचे चरणस्पर्श घेण्याचा आपल्याला कधीही अधिकार नव्हता, इतिहासात प्रथमच आम्ही चरणस्पर्श घेऊ शकलो, असा दावा केला आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानच्या अध्यक्षा दीपा मुधोळ यांनी मात्र हा दोन गटातील इश्यू असल्याचे सांगितले.