आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगावच्या शेलापुरीत २०० घरांवर लागणार महिलांच्या नावाच्या कुटुंबप्रमुख म्हणून पाट्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दिलीप झगडे 

माजलगाव - माजलगाव तालुक्यातील शेलापुरी ग्रामपंचायतीने नुकताच अनोखा ठराव केला आहे. गावातील महिलांना सन्मान मिळावा म्हणून तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील २०० घरांवर कुटुंबप्रमुख म्हणून घरातील महिलांच्या नावाची पाटी लावली जाणार आहे. महिलादिनी सकाळी ९ वाजता हा सोहळा घेतला जाणार असून असे करणारे शेलापुरी हे महाराष्ट्रातील पहिलेच गाव ठरणार आहे.शेलापुरी हे पुनर्वसित गाव आहे. गावात १८ बचत गट आहेत. या माध्यमातून महिलांनी आर्थिक प्रगती साधली आहे. गावात आतापर्यंत घरावर केवळ पुरुषांच्या नावाची पाटी असायची. गावच्या सरपंच महिला आहेत. गावात महिलांच्या माध्यामातून अनेक विकासकामे झाल्याने २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत महिलांच्या नावांची पाटी लावण्याचा प्रस्ताव सरपंच उमा झगडे यांनी मांडला होता. यानंतर यावर चर्चा झाली व ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ठरावावर सूचक म्हणून उपसरपंच गणेश सुंदरराव शेंडगे तर अनुमोदक अण्णासाहेब जाधव यांची नावे आहेत.या ग्रामसभेस अप्पासाहेब भारस्कर, श्रीकृष्ण शेंडगे, निवृत्ती सुरवसे, सिद्धार्थ घडसे, आसाराम शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब घडसे, जालिंदर जाधव, सुनीता मायकर, लक्ष्मीबाई भारस्कर, शेख नगमा चाँद पाशा आदींची उपस्थिती होती.अशी असेल पाटी

ग्रामपंचायतीतर्फे डिजिटल पाटी तयार करण्यात येत आहे. यावर कुटुंबातील महिलेचे नाव असेल. याचसोबत स्वच्छता, बेटी बचाव संदेश, ग्रामपंचायतीचे नाव व घर क्र. असणार आहे. बचत गटाच्या प्रमुख अर्चना सुरवसे, आशा वर्कर मीरा सुरवसे यासाठी परिश्रम घेत आहेत.महिलांसाठी आनंदाचा क्षण

गावातील महिलांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. प्रथमच आमच्या गावात घराच्या पाटीवर महिलेचे नाव लागतेय. गावातील महिलांना यामुळे नक्कीच सन्मान मिळेल.
उमा झगडे, सरपंच, शेलापुरी  महिलांच्या सन्मानासाठीच

आमच्या गावातील महिला बचत गट तसेच इतर माध्यमातून महिलांनी मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. त्यांचा सन्मान वाढावा यासाठी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे.
राजकुमार झगडे, ग्रामसेवक, शेलापुरी.बातम्या आणखी आहेत...