आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमाच्या तळाशी उजेडाचे दिवे लावत नागपुरात जल्लोषात निघाल्या रातरागिणी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

'दिवे लागले रे दिवे लागले
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठींच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जा
गले'

कवी शंकर रामाणी यांच्या कवितेत व्यक्त झालेल्या भावाप्रमाणे नागपुरात शेकडो महिलांनी अंधारावर चाल करत यापुढे अन्याय-अत्याचार सहन करणार नाही हे दाखवून दिले. या रातरागिणींचा निर्धार पाहून अंधारालाही कापरे भरले. सध्या देशभरातील वातावरण महिलांवरील अत्याचाराने ढवळून निघाले आहे. 

स्त्रियांवरील अत्याचारामुळे समाजमन सुन्न झाले आहे. याविरोधात भास्कर वृत्तपत्र समूहाच्या दै. दिव्य मराठी'ने चला मौन सोडू या' उपक्रमांतर्गत नाइट वाॅक' आयोजित केला होता. रविवार, २२ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १० या वेळेत हा नाइट वाॅक' चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, धरमपेठ येथून सुरू झाला. चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कपासून वाॅक वेस्ट हायकोर्ट रोडमार्गे फिरून परत ट्रॅफिक पार्क येथे आला. प्रास्ताविक आणि संचालन िदव्य मराठी नागपूर प्रतिनिधी अतुल पेठकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...