आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- शेतीपयोगी औषधांचे दुकान टाकण्यासाठी विवाहितेने माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा सासरच्यांनी लावल्यामुळे सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेने दोन जावा व त्यांच्या वडिलांच्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सातपूरजवळील तिरडशेत येथील भावले मळ्यात घडली हाेती. मयत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पाेलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील पाच जणांना अटक केली आहे. या सर्व संशयितांना ४ तारखेपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे.
नाशिकराेड परिसरातील खर्जुल मळा, चेहेेडीराेड येथे राहणाऱ्या व आत्महत्या केलेल्या विवाहितेचा भाऊ गणेश पोपटराव खर्जुल याने पाेलिसांकडेे दिलेल्या फिर्यादीनुसार, मयत नीलिमा ऊर्फ आदिका हिचा विवाह गेल्या सात महिन्यांपूर्वी तिरडशेत येथील उमेश भावले याच्याशी झाला होता. काही दिवसांनंतरच तिच्या पतीला पिंपळगाव बहुला येथे शेतीपयोगी औषधांचे दुकान टाकण्यासाठी माहेरून पाच लाख रुपयांचा हुंडा घेऊन यावा यासाठी छळ सुरू केला. तसेच तिला वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करून धमकावले. यानंतर तिच्या जावा गायत्री व सोनाली यांनी वडील बाळासाहेब बंदावणे यांच्या मदतीने तिचा नेहमी अपमान करून छळ केला. सततच्या या त्रासाला कंटाळून अखेर नीलिमाने घरी असताना पतीच्या मोबाइलवरील व्हॉट्सअॅपवर मेसेज करून 'मला माफ करा, सॉरी' असे म्हणत गळफास लावून घेत आत्महत्या केली.
त्यानुसार संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह तिचा छळ करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील उमेश सुकदेव भावले, संदीप सुकदेव भावले, किरण सुकदेव भावले, गायत्री संदीप भावले व सोनाली किरण भावले या पाच जणांना अटक केली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.