आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Women's T 2 World Cup Final Match Today; India's 'power' To Be Seen In Melbourne

महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज; मेलबर्नमध्ये दिसेल भारताची ‘शक्ती’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रथमच टी-२० फायनलमध्ये पोहोचलेला भारतीय महिला संघ आयसीसी चषक जिंकून इतिहास रचेल
  • कर्णधारास वाढदिवसाची भेट देण्याच्या तयारीत संघ

आज महिलादिनी मेलबर्नमध्ये टी-२० महिला विश्वचषकाचा अंतिम सामना होत आहे. लढत यजमान ऑस्ट्रेलियाशी आहे. भारताने किताब जिंकल्यास प्रथमच महिला क्रिकेटला आयसीसी चषक मिळेल. आपण फायनलमध्ये पहिल्यांदाच पोहोचलाे आहोत. देशाला भारतीय मुलींकडून अपेक्षा आहेत. त्यात कर्णधार हरमनप्रीत कौर, फलंदाज शेफाली वर्मा व लेग स्पिनर पूनम यादव सर्वात खास आहेत.

कर्णधारास वाढदिवसाची भेट देण्याच्या तयारीत संघ

पंजाबमधील मोगा येथील हरमनप्रीतचा आज वाढदिवस आहे. ३१ वर्षांच्या या खेळाडूचे आई-वडील पहिल्यांदाच सामना पाहण्यासाठी आलेत. व्हॉलीबॉलचे खेळाडू हरमंदरसिंग भुल्लर यांना मुलीला हॉकी खेळाडू करायचे होते. तिच्यासाठी हॉकी घेऊन आले होते. मात्र, हरमनप्रीत त्यावर क्रिकेट खेळू लागली. मोगामध्ये क्रिकेट अकादमी नव्हते. ती लहान भाऊ व मित्रांसोबत खेळायची. २००९ मध्ये एवढा उंच षटकार लगावला की तिच्या बॅटची तपासणीही झाली. हरमन सांगते की, टीम मला वाढदिवशी विजयाची भेट देईल.
 मुलगा बनून क्रिकेट शिकली, आज अव्वल फलंदाज

हरियाणातील रोहतकच्या शेफालीने भाऊ आजारी पडल्याने पहिल्यांदाच बॅट पकडली. त्या दिवशी ती भावाच्या नावाने मैदानात उतरली होती. तिची कहाणी दंगल गर्लसारखीच आहे. रोहतकमधील कोणत्याच क्रिकेट अकादमीने मुलगी असल्याने प्रवेश न दिल्याने वडील संजीव यांनी तिचे केस कापून टाकले. एका अकादमीने मुलगा समजून प्रवेश दिला. आयसीसी वुमन टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत जगातील क्रमांक एकची फलंदाज आहे. १६ वर्षांची शेफालीने १८ टी-२० सामन्यांमध्ये २१ षटकार लगावले आहेत.
 

कमी उंचीमुळे स्पिन गोलंदाज  झाली, आज सर्वात यशस्वी 

आग्रा येथील पूनमने आठव्या वर्षापासून खेळणे सुरू केले. तेव्हा लोक टोमणे मारायचे. दु:खी होत वडिलांनी खेळणे बंद केले. ती सांगते, मी आधी मध्यमगती गोलंदाज होते. मात्र, उंची कमी असल्याने कोचने सांगितले की, लेग स्पिनचा प्रयत्न कर. मात्र, हे कठीण आहे. यात हिंमत हवी. तू शिकू शकणार नाहीस, असेही होऊ शकते. मीही तसेच उत्तर दिले, रिस्क घेते आयुष्यात, आणखी काय. ५ फूट १ इंच पूनमने विश्वचषकात ४ सामन्यांत ९ विकेट घेतल्या आहेत. ती स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.