आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत पहिल्यांदा, ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा फायनलमध्ये

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • दाेन्ही उपांत्य सामन्यांना पावसाचा फटका, भारतीय संघ लढतीविना अंतिम फेरीमध्ये दाखल
  • स्पर्धेच्या सलामीनंतर आता फायनलमध्येही भारत- ऑस्ट्रेलिया झुंज रंगणार

सिडनी - महिलांच्या टी-२० विश्वचषकाची फायनल आता जवळ आली आहे. यासाठी भारत आणि यजमान  आॅस्ट्रेलियाचे महिला संघ सज्ज झाले आहेत. २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या महिलांच्या या विश्वचषकाची  फायनल येत्या रविवारी (८ मार्च) हाेणार आहे. तीन वेळच्या सेमीफायनलिस्ट भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे.  त्यामुळे भारताचा संघ पहिल्यांदाच टी-२० च्या वर्ल्डकपची फायनल खेळणार आहे. यादरम्यान टीमला चार वेळच्या विश्वविजेत्या आणि यजमान आॅस्ट्रेलिया संघाच्या आव्हानाचा सामना  करावा लागेल.  यजमान आॅस्ट्रेलिया संघाने करिअरमध्ये सलग सहाव्यांदा अंतिम फेरीचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आता हा अंतिम सामना अधिकच रंगतदार हाेणार असल्याची शक्यता क्रिकेट तज्ञांनी व्यक्त केली. भारतीय संघही  कसून मेहनत घेत आहे. पहिल्यांदाच अंतिम सामना जिंकण्याच्या इराद्याने संघाचे खेळाडू मैदानावर उतरणार आहेत. पहिल्याच प्रयत्नात  विश्वविजेतेपदाची  माळ गळ्यात पडण्यासाठी खेळाडू उत्सुक असल्याची प्रतिक्रिया हरमनप्रीतने दिली. हरमनप्रीत वाढदिवशी फायनल खेळणारी पहिली कर्णधार 

येत्या रविवारी, ८ मार्च राेजी भारतीय महिला संघाची वर्ल्डकपची फायनल आहे. याच दिवशी भारताची कर्णधार हरमनप्रीत काैरचा वाढदिवस आहे. ती रविवारी ३१ व्या वर्षात पदार्पण करेल. आपल्या वाढदिवशी वर्ल्डकपची फायनल खेळणारी हरमनप्रीत काैर ही जगातील पहिलीच कर्णधार ठरणार आहे.फायनलला चाहत्यांची पसंती; ५० हजार तिकिटांची विक्री 

वर्ल्डकपची फायनल मेलबर्नच्या एमसीजी स्टेडियमवर हाेणार आहे. याच फायनलला चाहत्यांची माेठी पसंती लाभली आहे. यातूनच आता ९० हजार क्षमता असलेल्या या स्टेडियमवर आता ५० हजार तिकिटांची विक्री झाली आहे.  भारतीय संघ तीन वर्षांनंतर दुसऱ्यांदा क्रिकेटची फायनल खेळणार आहे.नियमावर कर्णधारांची नाराजी; राखीव दिवसांची मागणी


पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना हाेऊ शकला नाही. आयसीसीच्या नियमानुसार भारतीय संघाला रनरेटच्या आधारे फायनलचे तिकीट मिळाले. मात्र, या नियमावर दाेन्ही संघांच्या कर्णधारांनी नाराजी व्यक्त केली. या  सामन्यासाठी राखीव दिवसाची त्यांनी मागणी केली. याचा निश्चित असा फायदा हाेईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 
हे आमच्यासाठी अधिकच दुर्दैवी ठरले की आम्ही मैदानावर  खेळलाे नाही. नियमानुसार आम्हाला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.  त्यामुळे आम्हालाही या नियमाचे पालन करावे लागणार आहे. अशा प्रकारच्या व्यत्ययाचा फटका बसणार, याची पूर्वकल्पना आम्हाला हाेती. त्यामुळेच सगळे मॅच जिंकले. - हरमनप्रीत, भारतीय कर्णधार

हा निर्णयच आमच्यासाठी धक्कादायक ठरला आहे. माेठ्या मेहनतीने आम्ही उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. मात्र, एका व्यत्ययाने आमच्या हातून अंतिम फेरीची संधी हिसकावली. यासाठी राखीव दिवसाची तरतूद गरजेची आहे. याचा  माेठा फायदा हाेईल. गटातील एका पराभवाने ही संधी हुकली.
-हीथर नाइट, कर्णधार, इंग्लंड महिला संघपेरीच्या अनुपस्थितीत यजमान विजयी; आफ्रिकेवर मात


दुसऱ्या उपांत्य सामन्यालाही पावसाचा फटका बसला. स्पर्धेत असे पहिल्यांदाच झाले. पेरीच्या अनुपस्थितीत यजमान आॅस्ट्रेलियाने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार आफ्रिकेवर ५ धावांनी मात केली.  ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १३४ धावा काढल्या. पावसामुळे  १३ षटकांत ९८ धावांचे आफ्रिकेला टार्गेट हाेते. मात्र,  आफ्रिकेने पाच  गड्यांच्या माेबदल्यात ९२ धावांपर्यंत मजल मारली.क्रिकटपटूंनी दिल्या भारतीय संघाला शुभेच्छा 

वरुणराजाच्या अवकृपेमुळे उपांत्य सामन्यांचा आनंद लुटता आला नाही. गटातील सर्वच विजयांनी भारतीय संघाला फायनलचे तिकीट मिळाले.    
- वीरेंद्र सेहवाग 
भारतीय संघाचा फायनलमधील प्रवेश हा आमच्यासाठी अभिमानास्पद गाेष्ट आहे. यासाठी  संघाला सदिच्छा. पावसामुळे इंग्लंडच्या आशेवर पाणी फेरले.  - मिताली राज

भारतीय महिला संघाचे टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमधील प्रवेशासाठी खास अभिनदंन. तसेच आता अंतिम सामन्यासाठी सदिच्छा. विजयाची आशा आहे.  
- विराट कोहली 

विश्वचषकातील आतापर्यंतची विजयी माेहीम आता अंतिम  सामन्यातही कायम  ठेवावी, यासाठी गुड लक. संघाकडून आता या माेठ्या यशाची आशा आहे.
- झुलन गोस्वामी
 
 

बातम्या आणखी आहेत...