आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिग्वा - भारतीय महिला संघ सध्याच्या टी-२० विश्वचषकात आतापर्यंत एकदाही पराभूत झाला नाही. पहिल्यांदा संघाने गटातील सर्व चारही सामने जिंकले. आता शुक्रवारी उपांत्य लढतीत भारताचा सामना इंग्लंडशी होईल. भारतीय टीम आठ वर्षांनी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. संघाने तीन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडला पहिल्या विश्वचषकात मात दिली. भारत व इंग्लंड यांच्यातील अंतिम टी-२० सामना मार्चमध्ये मुंबई झाला होता. त्यात भारताने आठ गड्यांनी विजय मिळवला होता. भारत याच प्रदर्शनाची पुनरावृत्ती करू इच्छितो. अंतिम चारमध्ये ऑस्ट्रेलिया व माजी चॅम्पियन वेस्ट इंडीज यांच्यात लढत होईल.
हरमनप्रीतच्या नावे सर्वाधिक धावा : भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर ४ सामन्यांत १७८ च्या सरासरीने १६७ धावा करत अव्वलस्थानी आहे. हरमनप्रीतने पहिल्या सामन्यात १०३ धावांची खेळी केली. स्मृती मानधनाने १४४ व मितालीने १०७ धावा काढल्या.
पूनम, राधा अव्वल गोलंदाज
भारताची लेगस्पिनर पूनम यादव चार सामन्यांत ८ बळी घेत सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. फिरकीपटू राधा यादवने सात विकेट घेतल्या आहेत. या दोघी अव्वल दहा गोलंदाजांत आहेत. इंग्लंडची वेगवान गोलंदाज अन्या श्रुबसोलने ७ विकेट घेतल्या. तिची सरासरी ३.१८ असून ती महत्त्वाची कामगिरी बजावू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.