Home | Sports | From The Field | Women's Twenty20 World Cup Thunder in the West Indies

महिला टी-20 विश्वचषकाचा आजपासून वेस्ट इंडीजमध्ये थरार

वृत्तसंस्था | Update - Nov 09, 2018, 08:59 AM IST

फलंदाजी बहरल्यास यश िनश्चित; हरमनप्रीत, स्मृती, मितालीवर मदार

 • Women's Twenty20 World Cup Thunder in the West Indies

  गयाना - वेस्ट इंडीजमध्ये आजपासून महिला टी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार असून भारतीय महिलांना तगड्या न्यूझीलंड संघाविरुद्ध आज (९ नोव्हे.) सलामी द्यायची आहे. भारतीय महिला संघ कागदावर तरी समतोल वाटत असला तरी फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. विशेष बाब अशी की, भारतीय महिला िक्रकेटपटूंना आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांच्या अनुभवाची कमतरता या स्पर्धेत िनश्चितपणे जाणवू शकते. काहीही असले तरी भारताकडे कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे फिरवणाऱ्या तीन दणकेबाज फलंदाज असून हरमनप्रीत कौर, स्मृती मनधाना आणि मिताली राज यांच्या फलंदाजीला जगातील सर्वच मातब्बर संघ वचकून आहेत.

  त्यामुळेच या स्पर्धेतही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज या चार संघांचे पारडे जड वाटत असले तरी भारतीय महिला संघ केव्हा डोके वर काढेल ते सांगता येणार नाही.
  भारतीय संघात काही उत्तम अष्टपैलूही आहेत. भारताला या स्पर्धेत डार्कहाॅर्स मानले जात आहे. कारण हा संघ कधी कशी कामगिरी करेल याचा अंदाज बांधणे िक्रकेटतज्ज्ञांना अजुनही शक्य झाले नसले तरी पहिल्या पाच संघात भारतीय महिला िनश्चितपणे असतील असा त्यांचा अंदाज आहे. गतविजेता वेस्ट इंडीज कमकुवत बांगलादेशविरुद्ध १० नोव्हेंबरपासून अभियानाला सुरुवात करणार अाहे. २५ नोव्हेबर रोजी जेतेपदाची लढत रंगणार आहे.


  भारताला ब गटात स्थान िमळाले असून क्रमवारीत पहिल्या दोन स्थानावर असलेले आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे दोन्ही तगडे संघ तसेच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान याच गटात असल्याने महिला टीम इंिडयाला तगडी झुंज द्यावी लागणार आहे.

  भारतीय महिला संघ
  हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मनधाना (उपकर्णधार), तानिया भाटिया, एकता बिश्त, डी. हेमलता, मानसी जोशी, वेदा कृष्णमूर्ती, अनुजा पाटील, पूनम यादव, मिताली राज, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिगेज, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, राधा यादव.

  भारतीय महिला संघाचे सामने
  वि. न्यूझीलंड - ९ नोव्हेंबर
  वि. पाकिस्तान - ११ नोव्हेंबर
  वि. आयर्लंड - १५ नोव्हेंबर
  वि. ऑस्ट्रेलिया - १७ नोव्हेंबर
  स्पर्धा कालावधी : ९ ते २४ नोव्हेंबर
  सहभागी देश : १०

  विश्वचषकाप्रमाणे टी-२० मध्येही अपेक्षा
  गेल्या वर्षी भारताने एकदिवसीय विश्वचषकात चमक दाखवली, तशीच अपेक्षा टी-२० मध्येही महिला िक्रकेट संघाकडून आहे. या संघाने शेवटचा विंडीज दौरा २०१२ मध्ये अंजूम चोप्राच्या नेतृत्वात केला आहे. त्या संघात आताच्या केवळ मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि एकता बिश्तचा समावेश होता. भारताची सर्वांत अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिची उणीव भारताला जाणवणार असून तिच्या जागी शिखा पांडेला गोलंदाजीचा भार सांभाळावा लागेल.

Trending