आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समान वेतन, सन्मानाच्या मागणीसाठी १५ लाख कर्मचारी, माेलकरणींची संपाची हाक, २८ वर्षांनी मागणार हक्क

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्न - समान वेतनाच्या मागणीसाठी स्वित्झर्लंडमधील १५ लाख महिलांनी १४ जून राेजी सामुदायिक संपाची हाक दिली आहे. यामध्ये कामगार तसेच माेलकरणी सहभागी हाेणार आहेत. समान वेतन आणि सन्मान ही महिलांची प्रमुख मागणी आहे. कार्यालयाच्या ठिकाणी आणि घरगुती स्तरावर मिळत असलेल्या असमानतेचा निषेध करण्यासाठी याअगाेदर १४ जून १९९१मध्ये  ५ लाख महिलांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली हाेती. स्वित्झर्लंडमधील कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार तीन दशकानंतरही महिलांच्या संदर्भात फार सुधारणा झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारला जागे करण्यासाठी १४ जूनला पुन्हा एकदा या महिला रस्त्यावर उतरणार आहेत. जास्तवेळ, जास्त रक्कम आणि सन्मान मिळावा अशी या महिलांची मागणी आहे.

 

स्वित्झर्लंडमधील महिलांना पुरुषांच्या तुलनेत २० % कमी वेतन मिळते. सांख्यिकी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार समान याेग्यता असलेले पुरुष आणि महिला यांच्यातल्या वेतनात जवळपास ८ टक्क्यांचा फरक आहे. 

 

आपल्यावर हाेणाऱ्या हिंसाचाराच्या बाबतीत झीराे टाॅलरन्सची भूमिका बजावावी. त्याचबराेबर देशभरात किमान वेतनाची सुरुवात करावी अशी महिलांची मागणी आहे. गेल्यावर्षी स्विस संसदेत, अधिक वेतन वाटप करण्यावर देखरेख ठेवण्याच्या कायद्याची अंमलबजावणी केली असून या कायद्यात बदल करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

 

महिलांना हक्क देण्यात स्वित्झर्लंड मागे : लेखिका जुनाेड

जिनिव्हातील लेखिका हुगुएट जुनाेड यांच्या म्हणण्यानुसार,  महिलांच्या प्रकरणात स्वित्झर्लंडची संकुचित भूमिका आहे.  महिलांना मतदानाचा हक्क (१९७१मध्ये) देणारा हा युराेपातील सगळ्यात शेवटचा देश आहे.  त्यानंतर १० वर्षांनी मुश्किलीने लैंगिक समानतेचा हक्क मिळाला पण त्याच्या अंमलबजावणीसाठी १५ वर्षे लागली.

बातम्या आणखी आहेत...