आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Women's World Cup: Starts Next Year On February 7; 31 Matches In 8 Teams, Days Reserved For Semifinal And Final

महिला विश्वचषक : पुढील वर्षी ६ फेब्रुवारीपासून सुरुवात; ८ संघांत ३१ सामने, उपांत्य व अंतिमसाठी राखीव दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वनडे विश्वचषकाचा कार्यक्रम जाहीर; टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस नव्हता
  • ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ६ वेळा किताब जिंकला

दुबई - आयसीसीने पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकाचा कार्यक्रम जाहीर केला. ६ फेब्रुवारीपासून त्याची सुरुवात आणि ७ मार्च रोजी अंतिम होईल. स्पर्धेत ८ संघांना स्थान मिळेल. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड व द. आफ्रिका संघांनी प्रवेश निश्चित केला. भारत व पाकिस्तान यांच्यात गेल्या नोव्हेंबरला होणाऱ्या मालिकेवर आयसीसीकडून निर्णय झाला नाही. त्या मालिकेनंतर ५ वा संघ ठरेल. इतर ३ संघांचा निर्णय जुलैमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या पात्रतेमध्ये होईल. मालिकेवर बीसीसीआय निर्णय घेऊ शकत नाही 

आयसीसीने २०१७ पासून महिला चॅम्पियनशिपच्या आयोजनाची सुरुवात केली. यात ८ संघांचा समावेश होता. सर्व संघांना ३ सामन्यांची सात मालिका खेळायची होती. अव्वल ४ संघ व यजमान न्यूझीलंडला विश्वचषकाचे तिकीट मिळणार होते. अव्वल ३ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका व न्यूझीलंड विश्वचषकासाठी पात्र ठरले. भारत व पाकिस्तान यांच्यात वनडे मालिकेवर अखेरचा निर्णय आयसीसीलाच घेणे आहे. बीसीसीआयने आयोजन न केल्यास पाकला मालिकेतील ६ गुण मिळतील. ते थेट पात्र ठरतील. त्यानंतर भारताला पात्रता स्पर्धा खेळावी लागेल. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ६ वेळा किताब जिंकला 

आतापर्यंत ११ वेळा विश्वचषक झाला. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सहा वेळा व इंग्लंडने ४ वेळा किताब जिंकला. न्यूझीलंड एकदा चॅम्पियन बनला. भारत २ वेळा २००५ व २०१७ मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. दोन्ही वेळा हारला. नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताला पराभव स्विकारावा लागला.टी-२० विश्वचषकात उपांत्य सामन्यास राखीव दिवस नव्हता 


गत आठवड्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले हाेते. ५ मार्च रोजी भारत व इंग्लंडचा उपांत्य सामना पावसामुळे पूर्ण झाला नाही. तालिकेत अव्वलस्थानी असल्याने भारत अंतिम फेरीत पोहोचला. त्यानंतर तज्ञांनी आयसीसीवर टीका करत राखीव दिवस ठेवण्याची अावश्यता असल्याचे म्हटले. गतवर्षी पुरुषांच्या वनडे विश्वचषकात उपांत्य सामना आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता.

 

सर्व संघ ७ लीग सामने खेळतील 

विश्वचषक खेळणारे ८ संघ लीग फेरीत एक दुसऱ्याशी भिडतील. म्हणजे प्रत्येक संघाला ७ लीग सामने खेळायचे आहेत. अव्वल चार संघ उपांत्य फेरीत जातील. पहिला उपांत्य ३ मार्च रोजी आणि दुसरा उपांत्य सामना ४ मार्च रोजी खेळवला जाईल. फायनल सामना ७ मार्च रोजी ख्राइस्टचर्चमध्ये होईल.
 

६ मैदानांवर होणार ३१ सामने 

स्पर्धेत ३० दिवसांत एकूण ३१ सामने होतील. हे सामने ऑकलँड, हॅमिल्टन, तारुंगात, वेलिंग्टन, ख्राइस्टचर्च व डुनेडिनमध्ये खेळवले जातील. सर्वाधिक ७ सामने हॅमिल्टनमध्ये व सर्वात कमी २ सामने ऑकलँडमध्ये खेळवले जातील. सध्याचा चॅम्पियन इंग्लंडचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाशी होईल.२६ कोटींचे बक्षीस, गतवर्षीपेक्षा ११ कोटींनी जास्त

स्पर्धेत एकूण २६ कोटींचे बक्षीस दिले जाईल. जे २०१७ पेक्षा ११ कोटी रुपयांनी जास्त आहे. आयसीसीचे सीईओ मनू साहनीने म्हटले की, महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या सत्रात आम्ही बक्षिसाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला.