आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Women's World T20 2018 IND Vs AUS : India Win By 48 Runs, Top Group B As It Happened

टी-20 विश्वचषक : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला संघाचा चौथा विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राेव्हिडेन्स -महाराष्ट्रीयन खेळाडू स्मृतीच्या (८३) झंझावातापाठाेपाठ अनुजा पाटीलच्या (३/१५) धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने शनिवारी विश्वचषक टी-२० स्पर्धेत अाॅस्ट्रेलियावर ४८ धावांनी मात केली. यासह भारताने ब गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १६७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाने १९.४ षटकांत ११९ धावांवर गाशा गुंडाळला. भारताकडून दीप्ती, राधा व पूनमने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. 

 

अाॅस्ट्रेलियाविरुद्ध चाैथा विजय : भारतीय संघाची टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी अत्यंत सुमार ठरलेली अाहे. भारताचा या टीमवरचा करिअरमधील हा चाैथा विजय ठरला. हे दाेन्ही संघ टी-२० च्या १५ व्या सामन्यात समाेरासमाेर अाले. 


गत चॅम्पियन विंडीज पाचव्यांदा उपांत्य फेरीत : गतविजेत्या विंडीज महिला संघाने अाता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. या संघाने शनिवारी श्रीलंकेचा पराभव केला. विंडीजच्या संघाने ८३ धावांनी सामना जिंकला. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा १७.४ षटकांत १०४ धावांवर धुव्वा उडवला. यासह विंडीजने किताबाचा दावा मजबूत केला. 


स्मृतीच्या ५५ चेंडूंत ८३ धावा 
सलगच्या सामन्यातील अपयशातून सावरलेली स्मृती अाता शनिवारी अाॅस्ट्रेलियाविरुद्ध लढतीत चमकली. तिने झंझावाती खेळी करताना यंदाच्या वर्ल्डकपमधील अापले पहिले अर्धशतक साजरे केले. तुफानी फलंदाजी करताना तिने ५५ चेंडूंमध्ये ८३ धावा काढल्या. यामध्ये ९ चाैकार अाणि ३ षटकारांचा समावेश अाहे. 

बातम्या आणखी आहेत...