Home | Sports | Cricket | Off The Field | Womens World T20: India beats New Zealand, Harmanpreet made century

महिला टी-20 विश्वकप : हरमनप्रीतसमोर न्यूझीलंडची टीम हतबल, टी-20 मॅचमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 04:11 PM IST

टीम इंडियाच्या 'लेडी रन मशीन'ने लगावले धडाकेबाज शतक, रचले हे विक्रम.

 • Womens World T20: India beats New Zealand, Harmanpreet made century

  स्पोर्ट्स डेस्क / गुयाना - महिला टी -20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव केला. कर्णधार हरमनप्रित कौरने 51 चेंडूत धडाकेबाज 103 धावा केल्या. टी -20 मध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 194 धावा केल्या. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाने 191 धावा केल्या होत्या. भारताने विजयासाठी दिलेल्या 195 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या टीमने केवळ 160 धावा केल्या.

  वर्ल्डकपमध्ये शतक झळकवणारी तिसरी खेळाडू
  हरमनप्रित वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणारी तिसरी खेळाडू ठरली आहे. याआधी 2010 मध्ये वेस्टइंडीजच्या डॉटिनने (नाबाद 112) आणि 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या लेनिंग (126) यांनी असा पराक्रम गाजवला होता. विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारताने न्यूझीलंड संघाला पराभूत केले. याआधी दोन सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वचषक स्पर्धेत भारताचा 10 वा विजय आहे. याबरोबरच महिला क्रिकेटमध्ये 10 किंवा त्याहून अधिक सामने जिंकणारा भारत पाचवा देश ठरला आहे.


  जेमिमा-हरमनप्रीत यांची शतकी भागिदारी
  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाची करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. 40 धावांवर तीन फलंदाज तंबूत परतले. तानिया भाटिया 9, स्मृती मंडाना 2 आणि दयान हेमलता केवळ 15 धावा करून बाद झाले. पहिलाच टी -20 विश्वकप खेळणाऱ्या जेमिमा रॉड्रिगजने एका बाजू सांभाळत 45 चेंडूंत 59 धावा केल्या. जेमिमा आणि हरमनप्रितने चौथ्या विकेटसाठी 134 धावांची भागिदारी केली.


  सूजी बेट्स चे अर्धशतक
  प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. पहिली विकेट 52 धावांवर पडली. अॅना पीटरसन 14 धावा काढून तंबूत परतली. त्यानंतर, सुजी बेट्सने 50 चेंडूत 8 चौकारांसह 67 धावा केल्या. पाचव्या विकेटच्या रूपात बेट्स 93 धावांवर बाद झाली. विकेटकिपर केटी मार्टिनने 25 चेंडूंत 8 चौकारांसह 39 धावा केल्या.

  भारतीय फिरकीपटूंनी टिपले आठ बळी
  न्यूझीलंडच्या नऊ विकेट्सपैकी आठ विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. हेमालाता आणि पूनम यांच्या प्रत्येकी 3-3 विकेट्स व्यतिरिक्त डाव्या हाताची फिरकीपटू राधा यादवने दोन विकेट्स घेतल्या. तर सुजी बेट्सची विकेट अरुंधती रेड्डीने घेतली.

Trending