रॅप-अप : वंडर / रॅप-अप : वंडर वूमन 1984 ची शूटिंग झाली पूर्ण, गॅल गेडोटने शेयर केले फोटोज

'वंडर वूमन 1984' 5 जून, 2020 ला होणार रिलीज..  

Jan 01,2019 12:08:00 AM IST

हॉलिवूड डेस्क : डीसीची अपकमिंग फिल्म 'वंडर वूमन 1984' चे शूटिंग पूर्ण झाली आहे. फिल्मची लीड अभिनेता गॅल गेडोटने इंस्टाग्रामवर फोटोज शेयर करून माहिती दिली आहे. गॅलने फिल्मच्या सेटवरच्या फोटोज शेयर केले आहेत, यातील एका फोटोमध्ये गॅल फिल्मची डायरेक्टर पॅटी जेन्किंससोबत फिल्ममढी एका शॉटनाद्द्ल डिस्कस करताना दिसत आहे. गॅलाने सेटच्या फोटोजसोबत एक लांब पोस्टही लिहिली आहे. ज्यामध्ये तिने आपली डायरेक्टर, कास्ट, क्रू आणि फॅन्सचे आभार मानले आहेत.

गॅलने लिहिले, "आम्ही पुन्हा एकदा करून दाखवले. ज्याप्रकारे पहिल्यांदा वंडर वूमनची शुटिंग करणे खूप छान होते त्याचप्रमाणे या फिल्मची शुटिंग त्यापेक्षाही जास्त यूनीक आणि स्पेशल होती. आम्ही 3 देशातील 4 वेगवेगळ्या लोकेशनवर शूट केले, आणि मला माझ्या 1000 क्रू मेंबर्सचा गर्व आहे, जे रोज काम करण्यासाठी येत राहिले आणि आपले बेस्ट काम करत राहिले. यापेक्षा जास्त चांगले अच्छे पार्टनर कुणाला हवे आहेत?"

We did it. Again!! And as much as the first time shooting Wonder Woman was amazing, this time was even more unique and special.. We shot in 4 very different locations in 3 countries, and I'm so soooo proud of the almost 1000 crew members who came to set every day, giving everything they have into our movie. Couldn't ask for better partners on this.. I'm so lucky to have the one and only Patty Jenkins, as my director. She always has our backs, she gives us the wings to dare, and everyday she helped us find the most creative version of ourselves .. I am so grateful to call her my friend. And to our AMAZINGly talented cast who made every day enjoyable and fun, thank you! Honestly.. Words cannot describe this experience.. This journey was so demanding and challenging but we all came and did our very best every take, every day, putting our all out there and I’m so proud... Thank you universe for this opportunity. I love this character. And thank you to all of you for being the best fans in the world. It was you that made me push myself every day. I'm so happy and excited, can't wait to share it with you in 2020! ❤️ Gal

A post shared by Gal Gadot (@gal_gadot) on Dec 23, 2018 at 9:35am PST

वंडर वूमन अभिनेत्रीने आपल्या डायरेक्टरविषयी लिहिले, "मी खूप नशीबवान आहे की, पॅटी जेन्किंस माझी डायरेक्टर होती. ती नेहमी आमच्यासोबत उभी राहायची, तिने आम्हाला हिम्मत दाखवायला पंख दिले प्रत्येक दिवशी आम्हाला आमचे चांगले काम करण्यासाठी मदत केली. मी तिला माझी मैत्रीण म्हणताना खूप खुश आहे. मी कास्टिंगमध्ये असलेल्या माझ्या सर्व जबरदस्त साथीदारांचेही आभार मानते ज्यांनी कामाचा प्रत्येक दिवस मजेशीर बनवला"

गॅलने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, "खरे सांगू, तर शब्द या अनुभवाला व्यक्त करू शकत नाहीत.. हा प्रवास खूप आव्हानांनी भरलेला होता. पण आम्ही सर्वांनी प्रत्येक दिवशी, प्रत्येक टेकमध्ये आमचे बेस्ट काम केले आहे. मी या भूमिकेवर खूप प्रेम करते. आणि तुम्हा सर्व प्रेमळ फॅन्सचेही आभार, तुम्ही जगात सर्वात चांगले आहेत. तुम्हीच मला प्रत्येक दिवशी पुढे जाण्यासाठी प्रेरित केले आहे".

X