आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 मार्केटमधून खरेदी करा हिवाळी कपडे, अर्ध्या किमतीत मिळेल स्वेटर आणि जॅकेट...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हिवाळा सुरू झाला आहे. अशात उबदार कपडे कमी भावात खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे मार्केट आपल्यासाठीच आहे. देशात असे अनेक बाजार आहेत, जेथे तुम्हाला स्वेटर, जॅकेट, कोट, सॉक्स, ग्लव्स, मफलर इत्यादी कपडे अर्ध्या किमतीत मिळतील. 
 

का मिळतात या मार्केटमध्ये इतक्या स्वस्त कपडे?
हे देशातील सगळ्यात जुने आणि ट्रेडिशनल होलसेल मार्केट हब आहेत. या ठिकाणावरून दिल्ली एनसीआर, यूपी, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, मध्यप्रदेश पर्यंत उबदार कपडे सप्लाय होतात. दिल्ली आणि लुधियाणा येथे या सर्व बाजारांचे डिस्ट्रीब्यूशन सेंटर आहे. येथून एका सेंटरनरून माल येतो आणि दुसऱ्या सेंटरला जातो. मोठ्या प्रमाणात स्टॉक उपलब्ध असल्यामुळे येथे अर्ध्या किमतीत कपडे मिळतात. 

 
चांदनी चौक, दिल्ली
जुन्या दिल्लीच्या चांदनी चौक मार्केटमध्ये रिटेलच्या तुलनेत अर्ध्या किमतीत स्वेटर, जॅकेट, कोट, सॉक्स, ग्लव्स, मफलर हे कपडे खरेदी करू शकता. उत्तर भारताच्या अनेर भागात येथुन कपडे सप्लाय होतात. चांदनी चौकात अनेक छोटी छोटी मार्केट आहेत ज्यात अनेक प्रकारची कपडे मिळतात. 
 
घुमर मंडी मार्केट आणि करीमपुरा बाजार लुढियाना, पंजाब
येथे वुलन कपडे आणि पार्टीवेयर कपड्यांची 1,000 पेक्षा जास्त दुकाने आहेत. येथे वुलन वेअर, कॅजुअल विअर, साडी, सूटच्या व्यतिरीक्त जीन्स, टी-शर्ट सारख्या कपड्यांवर 40 ते 50 टक्के सूट मिळते. 

 

अमीनाबाद मार्केट, लखनऊ, उत्तर प्रदेश
लखनऊचे अमीनाबाद मार्केट दिल्लीच्या चांदनी चौक प्रमाणे जुनी आणि होलसेल मार्केट आहे. येथे वुलन कपड्यांसोबतच आर्टिफिशयल ज्वेलरी मिळते. 

 

जोहरी बाजार, जयपूर
शॉपिंगसाठी  राजस्थानचा जोहरी बाजार ज्वेलरी साठी मोठे मार्केट माणले जाते. येथे वुलन कपडे, राजस्थानी बूट, आर्टिफिशियल ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी मिळते. 

 

रोहताश नगर, शाहदरा
ईस्ट दिल्लीमध्ये शाहदराचे रोहताश नगर लहान मुलांच्या कपड्यांचे होलसेल आणि रिटेल मार्केट आहे. येथे वुलन कपडे कमा भावात मिळतात.

बातम्या आणखी आहेत...