आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम करताना मंत्र्यांनी जनहिताच्या कामांना प्राधान्य देतानाच, उपेक्षित वंचित समाजघटकांमध्ये, तसेच शहरी भागातही जनाधार वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दिल्या.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅबिनेट व राज्यमंत्र्यांची तीन तास बैठक घेऊन सरकारमध्ये काम करताना घ्यावयाची काळजी आणि जनता व पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद याबाबत मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येते. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांच्या अशा बैठका घेतल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे तीन पक्षांमध्ये समन्वय कसा असावा याबाबत शरद पवार यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केले.
पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रत्येक पालकमंत्र्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री या नात्याने कोणती कामे प्राधान्याने करावीत याचे मार्गदर्शन शरद पवार यांनी केले, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. राष्ट्रवादीच्या कोट्यातील कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांनी आपापल्या विभागाचे काम कसे केले पाहिजे. मंत्रालयात किती दिवस हजर राहायचे. मतदारसंघात कसे जायचे. पालकमत्र्यांनी संबंधित जिल्ह्यात कसे काम करायचे याच्या सूचना दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.