आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजाने बहिष्कृत केलेल्या एचअायव्हीग्रस्तांना येथे मिळाला निवारा; एका व्यक्तीने वसवले गाव, मुलांचा अाॅर्केस्ट्रा प्रसिद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर जिल्ह्यातील रहिवासी रवी बापटले पत्रकार हाेते. २००७ मध्ये त्यांची भेट एका एचअायव्ही बाधित मुलाशी झाली. गावकऱ्यांनी त्याला बहिष्कृत केले हाेते. रवीने त्याच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली. हासेगाव (जि. लातूर) येथील अापल्या जमिनीवर सेवालय अाश्रम उघडला व तिथे या मुलाची राहण्याची व्यवस्था केली. मात्र, एक-एक करत असे अनेक एचअायव्हीबाधित रवीला भेटू लागले, ज्यांना कुटुंबीयांनी, गावकऱ्यांनी बेदखल केले हाेते. या सर्वांना साेबत घेऊन रवी यांच्या पुढाकारातून त्यांच्यासाठी एक छाेटेसे गावच उभारण्यात अाले. या गावाला नावही अनाेखे दिले अाहे. 'एचअायव्ही- म्हणजेच हॅपी इंडियन व्हिलेज.' परिसरातील लाेकांकडून त्यांना विराेध झाला. 'एचअायव्ही' हा संसर्गजन्य राेग नसल्याचे रवींनी समजावले. हळूहळू गावकऱ्यांनाही रवी यांचे म्हणणे पटले व त्यांनी या सर्वांना अापलेसे केले. गेल्या ११ वर्षांत येथे ५० मुले राहायला अाली. यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे २८ जण अाहेत. मुलांचा अाॅर्केस्ट्राही चांगलाच लाेकप्रिय अाहे. 

 

अकरा वर्षांत एकाही बाधिताचा मृत्यू नाही 
या गावातील सर्व लाेक राेज सकाळी व्यायाम करतात. नंतर मुले शाळेत निघून जातात. माेठी माणसे प्रशिक्षण घेतात. सायंकाळी करमणुकीचे कार्यक्रम हाेतात. तपासणीसाठी डाॅक्टर नियमित येतात. सुदैवाने ११ वर्षांत येथील एकाही एचअायव्ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

 

रवी बापटले म्हणतात- 'अशी संस्था तर बंदच पडायला हवी..' 
'या गावासाेबत तुमची संस्थाही माेठी हाेत अाहे...' याकडे लक्ष वेधले असता रवी बापटले म्हणाले, 'अशी अजून एखादी संस्था माेठी हाेऊ नये, बंदच पडायला हवी. भविष्यात एकही मुलगा एचअायव्ही पाॅझिटिव्ह हाेऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच अशा रुग्णांसाेबत भेदभाव करणारा समाजही नसावा. सर्वांनी साेबत राहायला हवे.' 
 

बातम्या आणखी आहेत...