आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखडलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या कामास गती येणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड : 'दिव्य मराठी'च्या बातमीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याने रखडलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या कामाला गती मिळणार असून प्रवाशांची त्रासातून सुटका होणार आहे. तसे आदेश रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिले.


पावसामुळे सिल्लोड शहरालगतच्या मंगरुळ फाट्यावर रस्ते खोदकामाच्या खड्ड्यांत बस व ट्रक सातत्याने फसत असल्याने दिवाळीच्या काळात सलग पाच दिवस दिवसभरातून पाच ते आठ तास वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची बातमी 'दिव्य मराठी'ने २६ आॅक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केली होती. दरम्यान, पुण्यात नोकरी करणारे अजिंठा येथील दिव्येंदू साठे दिवाळीसाठी २६ आॅक्टोबरला घरी अजिंठ्याला आले. त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. घरी गेल्यानंतर त्यांनी 'दिव्य मराठी'त प्रसिद्ध झालेले वृत्त वाचले. त्यांनी ते वृत्त व त्यासंबंधीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केली. बातमीत असलेला जगप्रसिद्ध अजिंठा लेणी व दोन राज्य तीन प्रांतांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम रखडल्याचा उल्लेख असल्याने बातमीची दखल घेत सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना दखल घेण्यास सांगितले. नितीन गडकरींनी दखल घेऊन गतीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.


दिव्येंदू साठे यांना २६ ऑक्टोबरला औरंगाबाद ते अजिंठा हे अंतर कापायला चारचाकी वाहनाने साडेचार तास लागले. त्यांना ही बाब खटकली. त्यावेळी त्यांच्याकडे आलेल्या काही विदेशी पाहुण्यांनी ही बाब जागतिक वारसा स्थळ असलेल्या या देशाला शोभत नाही असे म्हटले, हे त्यांना अपमानास्पद वाटल्याने त्यांनी लगेच पंतप्रधान कार्यालयास 'दिव्य मराठी'च्या बातमीचा संदर्भ देत ट्विट केले. त्यावर गडकरींनी ट्विट करून उत्तर दिले. दिव्येंदू साठे पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांचे वडील माधवराव साठे अजिंठ्याचे प्रगतिशील शेतकरी आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...