आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त मुंढेंनी कामकाज न सुधारल्यास काम बंद; नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी दिला इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक महानगरपालिकेच्या अायुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून गेले सहा महिने शहरात करवाढीसह अनेक मुद्द्यांवरून प्रशासकीय दहशतवाद सुरू अाहे. कामकाजाच्या तणावाखाली कर्मचाऱ्यांचा जीव जात असून सहायक अधीक्षकांच्या अात्महत्येचीही त्यांनी थट्टा केली अाहे. अाता तरी मुंढे यांनी त्यांच्या कामकाजात पंधरा दिवसांत सुधारणा करावी, अन्यथा कर्मचारी बेमुदत काम बंद अांदाेलन करतील. मुंढेंना महापालिकेत प्रवेशबंदी केली जाईल, शहरातील अत्यावश्यक सेवाही बंद पाडल्या जातील, असा इशारा महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी बुधवारी झालेल्या द्वारसभेत दिला. 


या सभेला कर्मचाऱ्यांनी जाऊ नये यासाठी कारवाईचा दबाव अाणला गेला हाेता. ताे झुगारून कर्मचारी राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वाराजवळ सायंकाळी सहा वाजता जमले. या वेळी नाशिक म्युनिसिपल कर्मचारी संघटनेबराेबरच विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांचे नेतेही झाडून उपस्थित हाेते. 


विकास झाला नाही तरी चालेल
एकवेळ नाशिक शहराचा विकास झाला नाही तरी चालेल. मात्र, अाता हा दहशतवाद संपवण्याची वेळ अाल्याची भाजप गटनेते संभाजी माेरुस्कर यांनी वस्तुस्थिती मांडली अाणि ६ महिन्यांत शहर २० वर्षे मागे गेले आहे. मुंढेंविराेधात अविश्वास ठराव अाणा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...