Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Worker injured due to pet dog bite in Yawal

यावलमध्ये पाळीव कुत्र्याने कामगारावर केला हल्ला.. हात आणि कमरेचे तोडले लचके

प्रतिनिधी | Update - Mar 16, 2019, 06:33 PM IST

शहरातील चोपडा रस्त्यावर लाकूड कटाई करण्याची साॅ मिल आहे. सदर साॅ मिल मालकाकडे काही पाळीव कुत्रे आहेत.

  • Worker injured due to pet dog bite in Yawal

    यावल- पाळीव कुत्र्याने अचानक हल्ला केल्यामुळे एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. प्रताप अमरसिंह पाटील (वय- 43, विरावली, ता. यावल) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता यावल शहरातील साॅ मिलमध्ये घडली. कुत्र्याने प्रताप पाटील यांचा डावा हात आणि कमरेचे लचके तोडले आहेत. यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

    शहरातील चोपडा रस्त्यावर साॅ मिल आहे. मिल मालकाकडे काही पाळीव कुत्रे आहेत. शनिवारी मिलमधील एका कुत्र्याने प्रताप पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर डॉ. शुभम जगताप, नीलिमा पाटील यांनी प्रताप पाटील यांच्यावर प्राथमिक उपचार केले. नंतर पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठ‍विण्यात आले आहे.

    पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

  • Worker injured due to pet dog bite in Yawal
  • Worker injured due to pet dog bite in Yawal

Trending