आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या गोशाळेत कामगाराची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कुसुंबा येथील रतनलाल बाफना गोशाळेतील कामगाराने शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गोशाळेतील राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल विजयसिंग सोलंकी (वय २५, मूळ रा. मोहोडिया, जिल्हा देवास, राज्य मध्य प्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे. बाफना गोशाळेत तो गायींचे दूध काढण्याचे काम करीत होता.


कामानिमित्त ८ वर्षांपूर्वी सोलंकी कुटुंबीय जळगाव येथे आले आहेत. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याने हातपाय दुखत असल्याने कामावर येत नसल्याचे मोबाइलव्दारे संपर्क साधून वडील विजयसिंग छत्रसिंग सोलंकी यांना कळवले होते. त्यानंतर दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गोशाळा व्यवस्थापनाने राहण्यासाठी दिलेल्या घरामध्ये फाशी घेतलेल्या अवस्थेत राहुलचा मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आलेली आहे. त्यामध्ये स्वखुशीने आत्महत्या करीत आहे. कुणाला दोषी धरण्यात येऊ नये, असा मजकूर हिंदी भाषेत लिहिला असल्याचे बाफना गोशाळेचे सुपरवायझर आनंदा ढेकाळे यांनी सांगितले. 


नातेवाइकांचा आक्रोश 
राहुल याचा मृतदेह शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. तेथे नातेवाइकांनी आक्रोश केला. राहुल याच्या पश्चात दोन पत्नी, आईवडील व दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...