आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तू माझ्या घरात का लक्ष देतो म्हणून परळीत मजुराचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- तू माझ्या घरात लक्ष का देतोस या कारणावरून शहरातील बरकतनगर येथील रोजंदारीवरील मजुराचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना परळी शहराजवळील नंदागौळ शिवारात सोमवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. शेख मकदूम कलंदर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेख समीर शेख वल्ली (रा.बरकतनगर, परळी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
परळी शहरातील बरकतनगर भागातील रोजंदारी मजूर शेख मकदूम कलंदर (२८) हा अापल्या चार मित्रांसह सोमवारी सायंकाळी पार्टीसाठी घराबाहेर पडला होता. पार्टी झाल्यावर चार मित्रांपैकी दोन मित्र घरी परत आले. यातील शेख मकदूम कलंदर व त्याचा दुसरा मित्र असे दोघे मागेच राहिले. सोमवारी पुसजवळ शेख मकदूम याचा मृतदेह काही लाेकांना आढळून आला. त्यांनी परळी ग्रामीण पोलिसांना माहिती देताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मकदूमच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे मोठे घाव आढळून आले. त्याचा गळा चिरलेला दिसून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी मकदूमचा भाऊ शेख मुस्तफा यांनी परळी ग्रामीण ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...