आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहलने पोस्ट केला वर्कआऊटचा व्हिडिओ तर गेल म्हणाला, 'देवा मला मदत कर', सोशल मीडियावर झाला ट्रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भल्या भल्या फलंदाजांना फिरकिच्या जाळ्यात अडकवणारा भारताचा फिरकिपटू यजुवेंद्र चहल सोशल मीडियावर ट्रोलच्या जाळ्यात अडकला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याने पोस्ट केलेला एक व्हिडिओ. चहलने जिममध्ये वर्कआऊट करतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. पण यजुवेंद्रची शरिरयष्टी पाहता या व्हिडिओवरून सोशल मीडिया यूझर्सने त्याला ट्रोल केले आहे. ट्रोल करणाऱ्यांमध्ये विंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचाही समावेश आहे. 


गेल म्हणाला, देवा मला मदत कर..
सोशल मीडियावरील चहलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूझर्सने त्याला ट्रोल केले. ख्रिस गेलनेही त्याच्या या व्हिडिओवर एक गमतीशीर कमेंट केली. ख्रिस गेल ने लिहिले, देवा मला मदत कर. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 टी 20 सामन्यांसाठी चहलची निवड करण्यात आली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...