Home | Khabrein Jara Hat Ke | World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos

सौंदर्याची खाण असूनही या ठिकाणी जात नाहीत पर्यटक, हे आहेत जगभरातील 10 सर्वात डेंजर्स Places

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 02:26 PM IST

संपूर्ण जग अतिशय सुंदर आहे. पण जगभरात काही अशी ठिकाणे आहेत, जी सुंदर असूनदेखील लोक तिथे जाण्यास घाबरतात.

 • World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos  संपूर्ण जग अतिशय सुंदर आहे. पण जगभरात काही अशी ठिकाणे आहेत, जी सुंदर असूनदेखील लोक तिथे जाण्यास घाबरतात. कुठला देश गरीब असल्याने तर कुठे युद्धामुळे पर्यटकांच्या यादीतून ही ठिकाणे वगळली गेली आहेत.

  सुंदर असण्यासोबतच अतिशय स्वस्त आहे हा देश...
  आजवर तुम्ही सोमालिया या देशाचे नाव नक्कीच ऐकले असेल. हा देश युद्धामुळे चर्चेत असतो. असे म्हटले जाते, की सोमालियामध्ये दरोडेखोरांना आश्रय दिला जातो. लोकांना येथे सतत आपला जीव मुठीत घेऊन वावरावे लागते. खरं तर येथील सुंदर बीजेस लोकांना आकर्षित करतात. इतर पर्यटक स्थळांच्या तुलनेत हा देश अतिशय स्वच्छ आणि स्वस्त आहे. आजही सोमालियाच्या अनेक बीचेसवर लोक आजपर्यंत गेलेले नाहीत.

  पुढील स्लाईड्सवर वाचा, सुंदर पण डेंजरस असलेल्या जगभरातील ठिकाणांविषयी...

 • World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos

  काश्मीर

  एकेकाळी काश्मीर हे हनीमून डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध होते. काश्मीर निसर्गाने संपन्न आहे. पण येथे वाढत चालेल्या दहशतवादी घटनांमुळे लोक येथे जायला घाबरतात. येथे दररोज तणावाचे वातावरण असते. त्यामुळे लोक येथे जाणे सहसा टाळतात.  

 • World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos

  अफगाणिस्तान

  अफगानिस्तान अतिशय सुंदर देश आहे. पण अलीकडे वाढत चालेल्या रुस आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे येथील परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. येथे येणा-या पर्यटकांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यासाठी तालिबानी बदनाम आहेत. तालिबान्यांनी या टुरिस्ट प्लेस अक्षरशः उद्धवस्त केले आहे.  

 • World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos

  नार्थ कोरिया

  अतिशय सुंदर आणि स्वच्छ देशांमध्ये नॉर्थ कोरियाची गणना होते. येथे एकही इंडस्ट्री नाही. त्यामुळे येथे प्रदुषणविरहित हवा आहे. पण येथे येणा-या पर्यटकांना येथील सरकारपासूनच भीती आहे. जर येथे एखादी पर्यटक व्यक्ती आली, तर तिला भयानक शिक्षा दिली जाते.  

 • World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos

  लायबेरिया

  इतर आफ्रिकन देशांप्रमाणे येथे अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत. पण हा देश महिलांसाठी सुरक्षित नाही. इतकेच नाही तर देशात बलात्काराच्या घटना सर्वाधिक होतात.  

 • World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos

  डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो

  हा देशसुद्धा सौंदर्याने नटला आहे. पण येथील राजकिय अस्थिरतेमुळे लोक येथे येणे टाळतात. येथे पर्यटकांचे अपहरण करणे, त्यांच्याजवळचे साहित्य-पैसे लुटणे हे येथील सामान्य बाब आहे. 

 • World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos

  एल साल्वाडोर

  या देशातील सुंदर बीचेस आणि उंच लाटा लोकांना आकर्षित करत असतात. पण या देशात असलेले माफिया आणि लोकल गुंड टुरिस्टना त्रास देतात. इतकेच नाही तर जगात सर्वाधिक हत्या याच देशात होतात.  

 • World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos

  बगदाद

  इराकमध्ये UNESCOने घोषित केलेल्या 4 हेरिटेज साइट्स आहेत. युद्धापूर्वी हे ठिकाण लोकांचे आवडते पर्यटन ठिकाण होते. पण आता दहशतवादी कारवायांमुळे येथे पर्यटकांनी येणे कमी केले आहे. हा देश ISIS साठी पोषक देश आहे. 

 • World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos

  ग्वाटेमाला

  या देशातील अनेक स्थळे येथील प्राचीन परंपरेचे दर्शन घडवणारी आहेत. इतकेच नाही तर येथील ब्लॅक बीचसुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. पण पर्यटनाच्या दृष्टीने हे ठिकाण डेंजरस समजले जाते. येथे येणा-या नैसर्गित आपत्ती आणि देशात असलेल्या भ्रष्टाचारामुळे लोकांना येथे येणे मनाई आहे.  

 • World 10 Most Beautiful Places But You Should Not Visit With Photos

  इजिप्त

  एकेकाळी इजिप्त पर्यटकांचे आवडते ठिकाण होते. पण दहशतवादी हल्ले आणि अपहरणांच्या वाढत्या घटनांमुळे येथे पर्यटकांनी येणे जवळजवळ बंद केले आहेत. आजही येथील पिरॅमिड्स प्रसिद्ध आहेत. फक्त आता या पिरॅमिड्सला दहशतवाद्यांनी नुकसान पोहोचवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

Trending