आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oktoberfest: सुरू झाला जगातील सर्वात मोठा Beer Festival; शेकडो वर्षांची परंपरा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीच्या म्युनिक शहरात या वर्षीच्या ऑक्टोबरफेस्ट अर्थात बिअर फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. 16 सप्टेंबरपासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणाऱ्या या उत्सवाला जगभरातून 60 लाखांहून अधिक परदेशी पर्यटक उपस्थिती लावतात. वाढते पर्यटन आणि मनोरंजन कार्यक्रमांमुळे या फेस्टीव्हलला जागतिक स्वरुप मिळाले आहे. जगातील सर्वात मोठे बिअर फेस्टीव्हल म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या फेस्टीव्हलची सुरुवात शेकडो वर्षांपूर्वी झाली होती.


अशी झाली सुरुवात...
12 ऑक्टोबर 1810 रोजी किंग लुडविगने प्रिन्सेस थेरेसा ऑफ सॅक्से-हिल्डबर्घ्यूसन हिच्याशी विवाह केला. त्या दिवशी राजाने आपल्या प्रजेसाठी म्युनिक येथे मेजवानी आयोजित केली होती. लोककला, मनोरंजन, दुकाने आणि इतर कार्यक्रमांनी या मेजवानीला अगदी लोक उत्सवाचे स्वरूप दिले होते. या मेजवाणीत जेवणासह पाहुण्यांचे स्वागत बिअर देऊन करण्यात आले होते. तीच परमपरा पुढे ऑक्टोबरफेस्ट म्हणून रूढ झाली. कालांतराने याचा संबंध चांगल्या शेती आणि मशागतीशी जोडण्यात आले. आजही विविध क्लब, संस्था आणि हॉटेल्स ग्राहक आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर 16 दिवस फेस्टिव्हलचे आयोजन करतात. गेल्या वर्षी या फेस्टिव्हलमध्ये किमान 60 लाख परदेशी पर्यटकांनी उपस्थिती लावली. तसेच विविध प्रकारच्या 77 लाख लीटर बिअर देण्यात आल्याची आकडेवारी आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या फेस्टिव्हलचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...