Home | International | Other Country | World Biggest, Cheapest Ship breaking Yard Of Bangladesh

हे आहे जगातील सर्वात स्वस्त आणि मोठे शिपयार्ड, अशी केली जाते मोठ-मोठ्या जहाजांची मोडतोड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 15, 2019, 10:11 AM IST

या ठिकाणी 2 लाखांहून अधिक कामगार अहोरात्र काम करत असतात.

  • World Biggest, Cheapest Ship breaking Yard Of Bangladesh

    इंटरनॅशनल डेस्क - बांग्लादेशच्या चटगाव शहराजवळ असलेले शिपयार्ड मोठ-मोठ्या जहाजांची विल्हेवाट लावणाऱ्या सर्वात स्वस्त शिपयार्ड्सपैकी एक आहे. बे ऑ बेंगॉलजवळ 18 किलोमीटर पसरलेल्या या ठिकाणाला जगातील सर्वात मोठे शिपयार्ड असेही म्हटले जाते. या ठिकाणी 2 लाखांहून अधिक कामगार अहोरात्र काम करत असतात. वर्षभरात विशालकाय शेकडो जहाजांचे येथे तकडे केले जातात. इतके मोठे जहाज की त्यांच्या नटबोल्टचे वजन सुद्धा माणसांपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे.

    > बांग्लादेशात वापरल्या जाणाऱ्या एकूण स्टीलचा 50 टक्के भाग याच शिपयार्डमधून जातो. मोठ-मोठ्या यंत्रांचा वापर करून हे मजूर एक-एक खिळा आणि नट-बोल्ट शिपपासून वेगळा करतात. यातून निघणारे स्टील एक-एक करून ट्रेलर्समध्ये भरून देशभर पाठवला जातो. त्यालाच वितळवून विविध प्रकारची साहित्ये बनवली जातात.
    > जगातील सर्वात स्वस्त शिपयार्ड असल्याने येथे येणाऱ्या जहाजांची संख्या इतर ठिकाणांपेक्षा अधिक आहे. येथे काम करण्यासाठी मजूर सहज उपलब्ध होतात. तसेच दिवसाला फक्त 275 रुपये घेऊन 14-14 तासांसाठी काम करण्यास तयार होता.
    > त्यामुळेच या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचे हाल झाले आहेत. लोखंड कापताना निघणारे कण, आणि विविध प्रकारच्या गॅसमुळे कित्येक मजुरांनी आपले डोळे आणि शरीराचे अंग गमवले आहेत. गेल्या 10 वर्षांत 125 हून अधिक मजुरांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या सुरक्षिततेचा विचार केला जात नाही.
    > 2016 मध्ये येथे 230 जहाजांची विल्हेवाट लावण्यात आली होती. तसेच 1 कोटी टन स्टील काढण्यात आला होता. बांग्लादेशात वापरल्या जाणाऱ्या एकूण स्टीलचा तो 60 टक्के भाग आहे. 1960 मध्ये भयंकर चक्रीवादळाने सीताकुंड किनाऱ्यावर एक मालवाहू जहाज अडकले होते. तेव्हा स्थानिक मजुरांच्या साह्याने ते कापण्यात आले होते. तेव्हापासूनच या शिपयार्डची स्थापना झाली.

    पुढील स्लाइड्सवर पाहा, सर्वात मोठ्या शिपयार्ड, तेथील कामगारांचे Photos

Trending