Home | Khabrein Jara Hat Ke | world biggest water fall will open in Singapore

येथील विमानतळावर जगातील सर्वात मोठा धबधबा १७ एप्रिलपासून खुले होणार

वृत्तसंस्था | Update - Apr 12, 2019, 10:38 AM IST

४ मजली उद्यान, ८ हजार कोटीे नूतनीकरणावर खर्च

  • world biggest water fall will open in Singapore

    सिंगापूर - जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ संकुल लोकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. गुरुवारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना त्याची झलक दाखवण्यात आली. आतापर्यंत त्याची प्रतिकात्मक छायाचित्रेच होते. ज्वेल चांगी विमानतळाचा परिसर १७ एप्रिल पासून सर्वांसाठी खुला होणार आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे वास्तुरचने अंतर्गत जगातील सर्वात मोठा धबधबा अनुभवता येतो. १३० फूट उंचीवर या धबधब्याचे पाणी कोसळतात. विमानतळाच्या नूतनीकरणावर सुमारे ८ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. चांगी एअरपोर्ट ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार विमानतळाचे एकूण क्षेत्रफळ १.३० लाख चौरस मीटर आहे. हे विमानतळ संकुल दहा मजली आहे. त्यापैकी ५ मजले जमिनीवर तर ५ मजले जमिनीत आहेत. येथे २८० व्यापारी गाळेही आहेत. प्रवाशांसाठी चेक-इनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. १५० आसनांची व्यवस्था आहे. १३० कॅबिनचे हॉटेलही आहे. छतावर जलतरण तलाव, चित्रपटगृहे, शॉपिंगची उत्तम सोय आहे.

    जगातील सर्वात व्यग्र विमानतळ

    विमानतळावर चार मजली उद्यान आहे. नामांकित वास्तुविशारद मोशे सफ्दी यांनी त्याचा आराखडा तयार केला आहे. संकुलाच्या नूतनीकरणाचे काम २०१४ पासून सुरू झाले होते. चांगी जगातील सर्वात व्यग्र सातवे विमानतळ आहे. २०१८ मध्ये येथील चार टर्मिनलचा ६ कोटी ५६ लाख प्रवाशांना वापर केला. टोकिया, द.कोरियातील इंचेऑननंतर याचा तिसरा क्रमांक लागतो.

Trending