आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरी काेम अाठ वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन:फायनलमध्ये अाेखाटाेवर 5-0 ने मात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

नवी दिल्ली - अाॅलिम्पियन मेरी काेमने शनिवारी गाेल्डन पंच मारून  एेतिहासिक कामगिरीची नाेंद केली. तिने अाठ वर्षांनंतर महिलांच्या जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तिने महिलांच्या ४८ किलाे वजन गटात हा साेनेरी यशाचा पल्ला यशस्वीपणे गाठला. यासह तिच्या नावे अाता विक्रमी सहाव्या सुवर्णपदकाची नाेंद झाली. अशा प्रकारे सहा सुवर्णपदके जिंकणारी मेरी काेम ही जगातील अाता एकमेव महिला बाॅक्सर ठरली.  


यासह भारताने यंदाच्या अापल्या घरच्या मैदानावरील या जागतिक स्पर्धेत चार पदके जिंकली. यात प्रत्येकी एक सुवर्ण अाणि राैप्यासह दाेन कांस्यपदकांचा समावेेश अाहे. फायनलमधील पराभवामुळे साेनिया चाहरला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच सिमरनजित काैर अाणि लवलीनाने अापापल्या गटात कांस्यपदके जिंकली अाहेत. 


मेरी काेम एकमेव चॅम्पियन :  भारताच्या मेरी काेमने अापल्या गटाच्या फायनलमध्ये युक्रेनच्या हना अाेखाटाेचा पराभव केला. तिने ५-०  ने गाेल्डन पंच मारला. याहत तिच्या नावे अाता जागतिक स्पर्धेत सहा वेळा चॅम्पियन हाेण्याचा विक्रम नाेंद झाला. अशी कामगिरी करणारी ती एकमेव खेळाडू अाहे. तसेच तिने अापल्या करिअरमध्ये दाेन वेगवेगळ्या वजन गटांत अातापर्यंत सात पदके जिंकली अाहेत. तिची कामगिरी काैतुकास्पद ठरली. 

 

१३ देशांचे खेळाडू फायनलमध्ये दाखल, चीन नंबर १

यंदाच्या या जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये ६६ देशांच्या महिला खेळाडू सहभागी झाल्या हाेत्या. त्यापैकी १३ देशांच्याच महिला बाॅक्सरला अापापल्या गटाच्या फायनलमध्ये प्रवेश करता अाला. तसेच या एकूण  संघांकडून २१ देशांचे संघच पदकाचे मानकरी ठरले.  यंदा नव्याने तीन देशांनी पदकाची कमाई केली. २०१६ मध्ये पदक जिंकणाऱ्या देशांची संख्या १९ अशी हाेती.  यंदा चीनच्या सर्वाधिक महिला बाॅक्सर फायनलमध्ये दाखल झाल्या हाेत्या. यात चीनने ४ सुवर्ण व १ राैप्य जिंकले.  चीनने पदकतालिकेत अव्वल अाणि भारताने चार पदकांसह तिसरे स्थान गाठले. 

 

तीन देशांनी प्रथमच जिंकली पदके

कोलंबिया (एक राैप्य), वेल्स (एक कांस्य) अाणि मंगोलिया (एक कांस्य) या तिन्ही देशांनी महिलांच्या गटात पहिल्यांदा पदकाची कमाई केली अाहे.  या स्पर्धेच्या इतिहासात अातापर्यंत ४५ देशांनी पदके जिंकली अाहेत. बेलारूस संघाला एक कांस्यदक मिळाले. यातून या टीमला १६ वर्षानंतर हे यश मिळाले.  या टीमने २००२ मध्ये शेवटचे पदक जिंकले  हाेते. त्यानंतर अाता बाजी मारली. 

 

बातम्या आणखी आहेत...