आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • World Boxing Championship | MC Mary Kom Enters World Women’s Boxing Championship Semifinals At Ulan Ude In Russia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक, स्पर्धेतील आठवे पदक केले पक्के; कोलंबियाच्या वेलेंसियाला 5-0 ने चारली धूळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कोमने रशियात खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या 51 किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. मेरीने गुरुवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य पूर्व सामन्यात रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती कोलंबियाच्या इंगरित वेलेंसियाचा 5-0 ने पराभव केला. या विजयासोबत मेरी कोमने वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आपल्या करिअरमधील आठवे पदक पक्के केले आहे. या अगोदर तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये थायलंडच्या जुतामास जितपोंगला 5-0 ने धुळ चारली होती. मेरी कोम पहिल्यांदाच 51 किलो वजनी गटात भाग घेत आहे. यापूर्वीचे तिने 48 किलो वजनी गटात सात पदक जिंकले होते. 
 

मेरी कोमने 2001 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पहिले पदक जिंकले गेले होते
मेरी कोमने वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आतापर्यंत सहा सुवर्ण आणि एक रौप्य पदक आपल्या नावे केले आहे. तिने आपले पहिले पदक (रौप्यपदक) 2001 मध्ये जिंकले होते. यानंतर ती सहा वेळा विश्वविजेती राहिली. मेरी कोमने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले होते. याशिवाय 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक आपल्या नावे केले होते. तिने आशियाई स्पर्धेत 5 सुवर्ण, एक कांस्य आणि एशियन इनडोअर गेम्समध्ये एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.