आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीषा -लवलीना वर्ल्ड चॅम्पियनला नमवून क्वार्टर फायनलमध्ये दाखल, महिलांची जागतिक बाॅक्सिंग स्पर्धा मनीषाची डिनावर मात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताची अाघाडीची खेळाडू मनीष माैनसह (५४ कि.) अाणि लवलीनाने (६९ कि.) अापली लय कायम ठेवताना रविवारी महिलांच्या वर्ल्ड बाॅक्सिंग चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या दाेन्ही प्रतिभावंत खेळाडूंनी अापापल्या गटात वर्ल्ड चॅम्पियनचा पराभव केला. यामुळे अाता त्यांचा पदकाचा दावा मजबूत झाला अाहे. यासह अाता मनीषा अाणि लवलीना अाता अापल्या गटातील पदकापासून अवघ्या पावलावर अाहे. अंतिम चारमधील प्रवेशाने त्यांना स्पर्धेतील अापले पदक निश्चित करण्याची संधी अाहे. यावर या दाेघींची नजर लागली अाहे. 
दुसरीकडे पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन मेरी काेमने अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली.यासह तिने विजयी सलामी दिली. मात्र, सरितादेवीला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. 


मनीषाकडून डिनाचा पराभव : भारताच्या मनीषाने अापल्या ५४ किलाे वजन गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियन डिना झाेलामानचा पराभव केला. तिने अाक्रमक खेळीच्या बळावर ५-० अशा फरकाने ही फाइट जिंकली. यामुळे तिला सलग दुसऱ्या विजयाची नाेंद करता अाली. तिने गत सामन्ययात दाेन वेळच्या पदक विजेत्या क्रिस्टिनाचा पराभव केला हाेता. हीच एकतर्फी विजयाची लय कायम ठेवताना तिने अाता दुसरीही फाइट जिंकली. मनीषा ही पहिल्यांदाच या स्पर्धेत अापले नशिब अाजमावत अाहे. 


मेरी कोमचा सहज विजय; सरिताचे अाव्हान संपुष्टात 
एेतिहासिक सातव्या पदकावर अाता मेरी काेमची नजर; त्यासाठी उत्सुक 

आपल्या सहाव्या किताबासाठी मैदानात उतरलेल्या मेरी कोमने दमदार सुरुवात केली. तिने लाइट फ्लायच्या ४८ किलाे वजन गटाच्या सलामीला कझाकिस्तानच्या एगेरिम केसेनेएवाला पराभूत केले. तिने सरस खेळी करताना ५-० अशा फरकानेे सामना जिंकला. तिने यादरम्यान ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, २९-२८ असा सहज विजय नाेंदवला. यासह तिने सहज बाजी मारत अंतिम १६ खेळाडूंत प्रवेश केला. यामुळे अाता तिला दाेन फाइटमधील विजयाने पदकाचा पल्लाही गाठता येईल. तिच्या याच एेतिहासिक पदकावर चाहत्यांची नजर लागली अाहे. 
सरिताची झंुज अपयशी : १२ वर्षांनी या स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या सरिताचे आव्हान संपुष्टात आले. ३६ वर्षीय सरिताला आयर्लंडच्या हॅरिंटनने लाइटवेटच्या ५७-६० किलो गटात ३-२ ने पराभूत केले. 

बातम्या आणखी आहेत...