आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेलंदाजीचे विज्ञान : फिजिक्सच्या मॅग्नस इफेक्टमुळे गाेलंदाजांना मिळते गती :वेगळ्या अॅक्शनमुळे बुमराहचा चेंडू अधिक मुव्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली - गाेलंदाजीच्या दाेन स्वरूपांविषयी आपण परिचित आहोत. यात वेगवान आणि फिरकीचा समावेश  आहे. या दाेन्हींमुळे गाेलंदाजी शैलीदार झाली. मात्र, एकट‌्या शैलीचा फरक पडत नाही. त्यासाठी विज्ञानाची गरज पडते. वेगवान गाेलंदाजी आणि फिरकीचा चेंडू टाकण्यासाठी गाेलदंाजांमध्ये फिटनेस, सुपर टेक्निक आणि अभ्यासाची गरज असते. याच्याच आधारे त्यांना या दाेन्ही स्वरूपांतील गाेलंदाजीमध्ये आपली चमक दाखवता येते. याच्याशी संबंधित मुद्द्यावर चर्चा..


सुरुवातीला चंुबकीय परिणाम लक्षात घेऊ....
चुंबकीय परिणाम : भौतिक विज्ञानाचा एक नियम म्हणजे मॅग्नस इफेक्ट. हे समजून घेतल्यानंतर गाेलंदाजीविषयीचे विज्ञान पूर्णपणे लक्षात येते. नियम सांगताे की,  गाेलाकार वस्तू (चेंडूसारखी) काेणत्या मीडियम (पाणी वा हवा) मध्ये पडून फिरत फिरत वेगाने पुढे जाते. यात एक क्रिया निर्माण हाेते. त्यामुळेच या वस्तूला बाहेरून फाेर्स मिळताे व दिशा मिळते, यालाच चुंबकीय परिणाम म्हणतात.   

हवेचा दबाव निश्चित करताे चेंडूंच्या वेगाची मुव्हमेंट 
ही तर विज्ञानाची शास्त्रीय भाषा आहे. आता क्रिकेटच्या भाषेत समजून घेऊ. जेव्हा गाेलंदाज हा चेंडूला रिलीज करताे, तेव्हा चेंडू हवेत फिरत-फिरत पुढे जाताे. या वेळी हवा आणि चेंडूंच्या मध्ये एक वेगवान क्रिया कार्यरत असते. याने चेंडूला फाेर्स मिळताे. त्यामुळे चंुबकीय पद्धती सक्रिय हाेते.  फिरकीपटूला चेंडू संथ गतीने टाकण्याचा सल्ला दिला जाताे. जेणेकरून चेंडूच्या दिशेवर परिणाम होऊ नये. 


...आणि हा बुमराह स्पेशल: रिव्हर्स चुंंबकीय परिणाम
साइड आर्म अॅक्शनमुळे आर्म राेटेशनची गती वाढते, इतर गाेलंदाजांपेक्षा सरळ  अँगल मिळताे. भारताचा  बुमराह  वनडेतील  सर्वाेत्कृष्ट गाेलंदाज मानला जाताे.  त्याला आपल्या साइड आर्म क्रियेमुळे रिव्हर्स चुंबकीय परिणामासाठी   फायदा हाेताे.  त्याची हात फिरवण्याची गती इतरांपेक्षा अधिक असते. हातून वेगाने चेंडू वेगाने निघताे, त्याला फाेर्स असताे, चंेंडू टप्पा खाऊन वेगाने निघून जाताे. 


गाेलंदाजीवर या फॅक्टरचा माेठा परिणाम होताे....
वातावरण :
 उष्ण वातावरणाचा गाेलंदाजांना माेठा फटका बसताे. मात्र, थंड वातावरण हे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे वेगवान गाेलंदाजांच्या कृतीला चांगले यश मिळते. उष्ण वातावरणात खेळपट‌्टीवर भेगा पडल्या तर त्याचा फायदा फिरकीपटूंना हाेताे. त्यामुळे स्पिनचा चेंडू चांगला टर्न घेताे. 


खेळपट्टी : खेळपट्टीवर चांगले गवत, हे वेगवान गाेलंदाजांसाठी फायदेशीर असते. यावर चेंडू उसळताे व मुव्हमेंटही चांगली करताे. तसेच गाेलंदाजाच्या रनअपमुळे तयार झालेल्या एका बाजूच्या फुटमार्कमुळे चेंडू स्पिन हाेण्यास मदतही हाेते.  


बाेटे आणि मनगटाची पाेझिशन : वेगवेगळ्या प्रकारचा चेंडू टाकण्यासाठी गाेलंदाज बाेटे आणि मनगटाच्या मुव्हमेंटचा वापर करतात. त्यामुळेच गाेलंदाजांकडून विविध पद्धतींनी चेंडू िरलीजही हाेताे.