आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंबर वन किवींची नजर विजयी षटकारावर; 1992 पासून पाकविरुद्ध वर्चस्व

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - जबरदस्त फाॅर्मात असलेला गुणतालिकेतील नंबर वन न्यूझीलंडचा संघ विश्वचषकात विजयी षटकारासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा वर्ल्डकपमधील सातवा सामना आज बुधवारी पाकिस्तानशी हाेणार आहे. न्यूझीलंड संघाला अद्याप यंदाच्या विश्वचषकात पराभवाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे ही विजयी माेहीम कायम ठेवण्यासाठी टीम उत्सुक आहे. 


दुसरीकडे पाकचा संघ यंदा १९९२ च्या विश्वचषकासारखी कामगिरी करत आहे. १९९२ आणि यंदा २०१९ च्या विश्वचषकात पाकला  दाेन विजयांपूर्वी विंडीजविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तसेच पाकचा एक सामना पावसामुळे रद्द झाला हाेता. तसेच १९९२ प्रमाणेच पाकला यंदा चाैथ्या व पाचव्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. 


पाकवर अक्रमचा फाेकस : क्षेत्ररक्षण सुधारणा गरजेची
आफ्रिकेविरुद्ध सामन्यात पाकच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी केली. यासह पाकने तमाम टीकाकारांना चाेख प्रत्युत्तर दिले.  आता विजयासाठी संघाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची गरज आहे.  


आम्ही स्पर्धेत आतापर्यंत १४ झेल साेडले आहेत. टीमचे खेळाडू चेंडू हातात येण्याची वाट पाहत नाहीत. त्याच्याआधीच झेप घेतात. विश्वचषकासारख्या माेठ्या स्पर्धेत अशा चुका महागात पडतात. यात सुधारणा करण्याची गरज आहे.


- कर्णधार सरफराजला इमाद वसीमच्या जागी फलंदाजी क्रमवारीत सुरुवातीला यायला हवे.
- फखरही विकेट टिकवून ठेवण्याचे शिकत आहे. ही प्रतिस्पर्धी संघासाठी धाेक्याची घंटा आहे.