World cup / विराट-रोहितला बाहेर जाणारा चेंडू; धोनीला कमी गतीच्या चेंडूपासून धोका

विश्वचषकात आता महत्त्वाच्या टप्प्यात सामना जिंकल्यानंतर प्रत्येक टीमला सतत सुधारणा करावी लागेल

दिव्य मराठी वेब

Jun 30,2019 09:12:00 AM IST

विश्वचषकात आता महत्त्वाच्या टप्प्यात सामना जिंकल्यानंतर प्रत्येक टीमला सतत सुधारणा करावी लागेल, अन्यथा मोठ्या सामन्यात त्याचा फटका बसू शकतो. टीम इंडियाची फलंदाजी गेल्या २ सामन्यांत रंगात दिसली नाही. फलंदाजांची चूक पुन्हा होऊ नये. या चुका टाळाव्या लागतील...


विराट कोहली : आऊटसाइड ऑफ स्टम्प लाइन व गुड लेंथ
कर्णधार कोहलीमध्ये जास्त उणिवा नाहीत. तरी आऊटसाइड ऑफ स्टम्प लाइन व गुड लेंथ चेंडूवर थोडे लक्ष द्यावे लागेल. ऑफ स्टम्पपासून स्विंग होणाऱ्या चेंडूविरुद्ध स्ट्राइक रेट ६०.९७ असतो. त्याचा करिअर स्ट्राइक रेट ९३.०१ आहे. बाहेर जाणाऱ्या स्विंग चेंडूवर अडखळतो. त्याचा स्ट्राइक रेट ७३ चा होतो.


रोहित शर्मा : बाहेर आणि स्विंग होणाऱ्या चेंडूवर अडखळतो
रोहित शर्माचा करिअर स्ट्राइक रेट जवळपास ८९ आहे, मात्र डावाच्या सुरुवातीला बाहेर जाणाऱ्या आणि स्विंग होणाऱ्या चेंडूविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट केवळ ५२.९० असा आहे. केवळ स्विंगच नाही, तर बाहेर व वळणाऱ्या चेंडूवरदेखील डावाच्या सुरुवातीला अडचण येते. अशा चेंडूवर स्ट्राइक रेट ६१.११ आहे.


धोनी : फिरकीपटूंचा कमी गतीचा चेंडू
डावाच्या सुरुवातीला महेंद्रसिंग धोनी कमी गतीच्या चेंडूवर अडचणीत येतो. वेगवान गोलंदाजांना १२५ किमीपेक्षा कमी वेगाचा चेंडू टाकल्यास धोनीची सरासरी १०.५० आणि स्ट्राइक रेट जवळपास ७५ राहतो. धोनी फिरकीपटूविरुद्ध अनेकदा संघर्ष करताना दिसतो. फिरकीपटूविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट ६० पर्यंत कमी हाेतो. त्याला सावधतेने खेळावे लागले.


राहुल : स्टम्पच्या रेषेतील फुल इनस्विंगर
राहुलला आत येणारा व स्विंग चेंडू त्रास देतो. स्टम्पला लक्ष्य करून टाकलेल्या फुल इनस्विंगरविरुद्ध राहुलचा स्ट्राइक रेट केवळ ४८.७१ व सरासरी १०.५० आहे. अशा चेंडूवर तो पायचीत किंवा झेलबाद होतो. यॉर्करवर त्याची सरासरी ६.५० आहे.


शंकर : गुड लेंथ आऊट साइड ऑफ स्टम्प
जेथे फुल व शॉर्ट चेंडूविरुद्ध त्याचा स्टाइक रेट १०० च्या जवळपास असतो, तेथे गुड लंेथवर कमी होऊन ५८ वर येतो. गुड लेंथ चेंड जर ऑफ स्टम्पच्या जवळ येत असेल तर शंकर अजून अडचणीत येतो. स्ट्राइक रेट ६० च्या जवळ राहतो.


केदार जाधव : आत येणारा चेंडू
केदार स्टम्प टू स्टम्प लाइन चुकल्यावर तो चांगले फटके खेळतो. आत येणाऱ्या चेंडूवर त्याचा स्ट्राइक रेट ६९.२३ राहतो, मात्र त्याचा स्ट्राइक रेट ८०.३९ चा आहे. याच्या उलट बाहेर जाणाऱ्या चेंडूवर त्याचा स्ट्राइक रेट जवळपास १४१ होतो.


हार्दिक : आऊटसाइड ऑफ स्टम्प
हार्दिकला फिरकीपटूविरुद्ध कोणतीही अडचण नाही. त्यावर पांड्याची सरासरी ७३ ची व स्ट्राइक रेट १३६.८७ चा राहतो. वेगवान गोलंदाज जेव्हा ऑफ स्टम्पवर बाहेरील रेषेवर चेंडू टाकल्यास अडचण येते. त्याचा स्ट्राइक रेट ९० पर्यंत येतो.

X
COMMENT