Home | Sports | From The Field | world cup England beat New Zealand by 119 runs

इंग्लंड संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित; न्यूझीलंडवर 119 धावांनी मोठा विजय 

वृत्तसंस्था, | Update - Jul 04, 2019, 09:41 AM IST

विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 वेळा शतकी भागीदारीचा नवा विक्रम

 • world cup England beat New Zealand by 119 runs

  चेस्टर - जॉनी बेयरस्टो (१०६) आणि जेसन रॉय (६०) यांच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडवर ११९ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला आहे. न्यूझीलंडच्या आशा संपुष्टात आल्या.


  प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ८ बाद ३०५ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड डावा १८६ धावांवर ढेपाळला. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने १०६ व जेसन रॉयने ६० धावा काढल्या. बेयरस्टोचे हे चालू विश्वचषकात सलग दुसरे शतक ठरले. तिसरी शतकी भागीदारी करून दिली. बेयरस्टो कोणत्याही विश्वचषकात सलग २ शतके झळकावणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू बनला आहे. बेयरस्टोला मॅट हेन्रीने त्रिफळाचीत केले. सलग निशामने राॅयला बाद करत जोडी फोडली. रूट २४ धावांवर बाद झाला.


  प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून विलिम्सनने २७, टेलरने २८ आणि निशामने १९ धावा केल्या. लॉथमने अर्धशतक ठोकले. त्याने ६५ चेंडूत ५७ धावा काढल्या. इंग्लंडच्या मार्क वुडने ३४ धावांत ३ विकेट घेतल्या. आर्चर, ओक्स, प्लंकेट, राशिद यांनी प्रत्येकी एकाला टिपले.


  बोल्ट विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वाधिक बळी घेणारा पहिला गोलंदाज
  वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याने विश्वचषकात ३७ बळी घेतले. त्याने डॅनियल व्हिटोरी व जेकब ओरम यांचा ३६-३६ बळींचा विक्रम मागे सोडला.


  विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच १२ वेळा शतकी भागीदारीचा नवा विक्रम
  रॉय आणि बेयरस्टोने पहिल्या गड्यासाठी १२३ धावा काढल्या. चालू विश्वचषकातील ही १२ वी शतकी भागीदारी ठरली आहे. हा कोणत्याही विश्वचषकात सर्वाधिक शतकी भागीदारी बनण्याचा नवा विक्रम बनला. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकामध्ये एकूण ११ सलामी भागीदाऱ्या बनल्या होत्या. यंदा १२ सलामी झाल्या.


  रॉय व बेयरस्टोच्या १६६ धावा; इतर फलंदाजांच्या १२४ धावा
  इंग्लंडचे सलामीवीर मैदानावर असताना टीमच्या वेगाने धावा होत होत्या. रॉय आणि बेयरस्टो जोडीने १६० चेंडूचा सामना करताना १२४ धावा काढल्या. इंग्लंडने सुरुवातीला ३० षटकांत १९४ धावा केल्या आणि एक गडी गमावला. पुढील १० षटकांत केवळ ४७ धावा केल्या व ३ विकेट गमावल्या. इंग्लंडने अखेरच्या १० षटकांत ६४ धावा काढल्या आणि ४ गडी गमावले.

Trending