आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • World Cup: India Beat Bangladesh By 28 Runs; Bangladesh Out Of The Tournament

World Cup : भारताने बांगलादेशाला 28 धावांनी केले पराभूत; बांगलादेश विश्वचषक स्पर्धेबाहेर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - रोहित शर्माच्या (१०४) शानदार शतक आणि बुमराह (४ बळी), शमीच्या (३ बळी) जोरावर भारतीय संघाने बांगलादेवर २८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. बांगलादेश यापूर्वीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झालेला आहे. प्रथम खेळताना भारताने ५० षटकांत ९ बाद ३१४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश ४८ षटकांत सर्वबाद २८६ धावा करू शकला. 


तत्पूर्वी, रोहित शर्माने विश्वचषकात आतापर्यंत ४ शतके झळकावली. एका विश्वचषकात चार शतके झळकावणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला. श्रीलंकेचा कुमार संगकाराने २०१५ मध्ये चार शतके झळकावली होती. रोहित विश्वचषकात प्रत्येक तिसऱ्या डावानंतर शतक ठोकत आहे. लोकेश राहुलने ७७ आणि ऋषभ पंतने ४८ धावा केल्या.


रोहित व लोकेश राहुलने स्पर्धेत दुसऱ्यांदा शतकी भागीदारी रचली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १८० धावा जोडल्या. रोहितला सौम्य सरकारने बाद केले. कर्णधार कोहली (२६) व हार्दिक पांड्या (०) यांना मुस्तफिजुरने ३९ व्या षटकात बाद केले. ऋषभ पंतने (४८) चांगली खेळी केली. धोनी (३५) अखेरच्या षटकात बाद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने ५ बळी घेतले. त्याने भारताविरुद्ध वनडेत तिसऱ्यांदा ५ विकेट घेतल्या. 


रोहितच्या चौथ्यांदा वर्षात हजार धावा
रोहितच्या २०१९ मध्ये ११०० धावा पूर्ण झाल्या आहेत. त्याने सलग तिसऱ्या वर्षी व करिअरमध्ये चौथ्यांदा एका वर्षात हजारपेक्षा अधिक धावा काढल्या. यापूर्वी २०१३ (११९६), २०१७ (१२९३), २०१८ (१०३०) मध्ये अशी कामगिरी केली.


शाकिबचे अर्धशतक
बांगलादेशकडून सलामीवीर तमिम इक्बाल २२ आणि सौम्य सरकार ३३ धावांवर परतले. शमीने तमिमला बाद करत पहिले यश मिळवून दिले. शाकिब अल हसनने अर्धशतक झळकावले. त्याने सर्वाधिक ७४ चेंडंूत ६६ धावा काढल्या. पांड्याने कार्तिकच्या हाती त्याला झेल बाद केले. मुस्तफिजूरने २४ आणि दासने २२ धावा केल्या. त्यानंतर शबीर रहेमानने (३६) व सैफुद्दीनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शबीर व रहेमान जोडीने ६६ धावांची भागीदारी केली. सैफुद्दीनने (५१) अर्धशतक करत अखेरच्या क्षणी सामन्यात रोमांच वाढवला होता.  हार्दिक पांड्याने ६० धावांत ३ बळी घेतले. बुमराहने ५५ धावांत ४ विकेट घेतल्या.