आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकप : भारतीय संघाचे टाॅप-७ फलंदाज अर्धशतकी खेळीत अपयशी; ६ गड्यांनी झाला पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओव्हल - टीम इंडियाची फलंदाजी विश्वचषकासाठीच्या तयारीसाठी आयाेजित वॉर्मअप सामन्यात निराशादायी ठरली. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्ध या सामन्यात भारताला  ३९.२ षटकांत अवघ्या १७९ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने चार गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. 


भारतीय संघातील टाॅप-७ पैकी एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळीचा पल्ला गाठता आला नाही. आठव्या स्थानावर असलेल्या रवींद्र जडेजाने एकाकी झुंज देताना अर्धशतक साजरे केले. त्याने ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून टीमच्या धावसंख्येला गती दिली. त्यामुळे भारताला झटपट स्वस्तात गुंडाळण्याचा न्यूझीलंड टीमचा प्रयत्न अपयशी ठरला. या टीमचा वेगवान गाेलंदाज ट्रेंट बाेल्टने ३३ धावा देताना ४ विकेट घेतल्या.  विराट काेहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

 

पाॅवरप्लेमध्ये ट्रेंट बाेल्टची कामगिरी ठरली हाेती सर्वात वरचढ; भुवनेश्वर चाैथ्या स्थानावर

बाेल्टच्या २०१५ वर्ल्डकपनंतर पाॅवरप्लेमध्ये (१ ते १० षटक) सर्वाधिक ४४ विकेट घेतल्या. त्याची भारताविरुद्धची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने आतापर्यंत भारताविरुद्ध १२ सामन्यांत २२ विकेट  घेतल्या आहेत. गत चार वर्षांत पाॅवरप्लेदरम्यान टाॅप-५ गाेलंदाजांची कामगिरी सरस ठरली.

 

जडेजाने डाव सावरला; अर्धशतकी खेळी
रवींद्र जडेजा (५४) आणि कुलदीप यादवने (१९) संघाचा डाव सावरला. त्यांनी न्यूझीलंडची गाेलंदाजी फाेडून काढताना नवव्या विकेटसाठी ६२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे टीमच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. जडेजाने ५० चेंडूंमध्ये सहा चाैकार आणि दाेन षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. दरम्यान, त्याला फर्ग्युसनने बाद केले. तसेच बाेल्टने कुलदीप यादवची विकेट काढली. शमीने नाबाद २ धावा काढल्या.