• Home
  • Sports
  • World Cup preparations of England's hockey team in 35 40 degree temperature

इंग्लंडच्या हाॅकी टीमची / इंग्लंडच्या हाॅकी टीमची ३५-४० डिग्री तापमानामध्ये वर्ल्डकपची तयारी; दुख‌ापत टाळण्यासाठी प्रचंड मेहनत

इंग्लंडच्या टीमची हाॅकी वर्ल्डकपसाठीची तयारी अाता शेवटच्या टप्यात अाहे.भारतातील भुवनेश्वर येथे २८ नाेव्हेंबरपासून हाॅकीच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात हाेईल. या स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ कसून मेहनत घेत अाहे. यासाठी बिशमच्या एबे नॅशनल स्पाेर्ट‌्स सेंटरवर खास प्रशिक्षण अाणि सराव शिबिराचे अायाेजन करण्यात अाले.

Oct 01,2018 08:13:00 AM IST

बिशम (इंग्लंड)- इंग्लंडच्या टीमची हाॅकी वर्ल्डकपसाठीची तयारी अाता शेवटच्या टप्यात अाहे.भारतातील भुवनेश्वर येथे २८ नाेव्हेंबरपासून हाॅकीच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात हाेईल. या स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ कसून मेहनत घेत अाहे. यासाठी बिशमच्या एबे नॅशनल स्पाेर्ट‌्स सेंटरवर खास प्रशिक्षण अाणि सराव शिबिराचे अायाेजन करण्यात अाले.


याठिकाणी इंग्लंड संघातील खेळाडू हे ३५ ते ४० डिग्री तापमानामध्ये सराव करताना दिसतात. याच्या अाधारे हे खेळाडू भारतामधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्नशील अाहेत. कारण, नाेव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान भुवनेश्वर येथील तापमान हे ३२ ते ३५ डिग्री असते. याचा अापल्या संघातील खेळाडूंना धाेका निर्माण हाेऊ नये, याचीच सध्या इंग्लंडकडून खास खबरदारी घेतली जात अाहे.


भुवनेश्वर येथे २८ नाेव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान हाॅकीची विश्वचषक स्पर्धा अायाेजित करण्यात अाली. इंग्लंडच्या टीमने पहिल्यांदा भुवनेश्वरचा दाैरा केला. त्यादरम्यान प्रचंड उष्णतेमुळे इंग्लंडचे चार ते पाच खेळाडू अाजारी पडले. पुन्हा असा धाेका निर्माण हाेऊ नये, याची खबरदारी अाता इंग्लंडचा संघ घेत अाहे. यामुळे स्पर्धेदरम्यानचा धाेकाही टाळता येईल, असा विश्वास व्यवस्थापकांनी व्यक्त केला.


सर्वाधिक कपडे घालून सराव
हाॅकी गाेलरक्षकाच्या किटचे वजन १५ किलाेचे असते. फाेमपासून तयार असलेला हा ड्रेस घालून खेळणे अाव्हानात्मक असेल. भारतातील तापमानाशी जुळवून घेण्याचा माझा प्रयत्न असेल.
-हॅरी गिब्सन, गोलकीपर


हाॅकी अधिक वेगवान झाली
नव्या नियमांमुळे अाता हाॅकी ही पूर्वीपेक्षा अधिक वेगवान झाली. हे बदल अात्मसात करावे लागतील. प्रत्येक क्वार्टरनंतर दाेन मिनिटांची विश्रांती असते. यात अाम्ही अव्वल कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असू.
-सॅम वार्ड, फॉरवर्ड


उष्णतेने अधिक दुखापती
सर्वात जाेखीम ही दुखापतीच्या काळात असते. यात खेळाडूवर प्रचंड दबाव असताे. याचा कामगिरीवर परिणाम पडताे. उष्णतेमुळे अधिक दुखापतीचा धाेकाही असताे.
-क्रिस ग्रासिक, मिडफील्डर


वाॅटर-बेस्ट पिचवर सराव
गतवेळी अामचे खेळाडू अाजारी पडले. हे टाळण्यासाठी रिसर्च टीमने वेगळा प्रयाेग साकारला. इम्युन सिस्टिम वाढवण्यासाठी अाम्ही वाॅटरबेस्ड पिचवर सराव करत अाहोत. यातून अाम्हाला हाेणारा धाेकाही टाळता येईल.
-हेनरी वेयर, डिफेंडर


जुळवून घेण्यास प्रचंड मेहनत
भारतामधील तापमानात अाम्ही प्रचंड मेहनत घेत अाहाेत. यासाठी अाम्ही ४० डिग्री तापमानात स्नान अाणि २० डिग्रीमध्ये सन-बाथही घेत अाहोत. याचा निश्चित असा माेठा फायदाही अाम्हाला स्पर्धेदरम्यान हाेईल.
-फिल रॉपर, मिडफील्डर

X