आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकप : 12 खेळाडू निश्चित; तीनसाठी 11 खेळाडू शर्यतीमध्ये,  30 मेपासून वर्ल्डकप; भारताचा 15 सदस्यीय संघ हाेणार सहभागी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सलगच्या मालिका विजयांनी अात्मविश्वास द्विगुणीत झालेल्या टीम इंडियाने नुकतेच दाैऱ्यात न्यूझीलंडचा वनडे मालिकेत ४-१ ने पराभव केला. यासह भारताने अाता अागामी वनडे वर्ल्डकपसाठीची तयारी कसून करत असल्याचे संकेत दिले. येत्या ३० मेपासून इंग्लंड येथे वनडेचा वर्ल्डकप हाेणार अाहे. या विश्वचषकापूर्वी टीम इंडिया शेवटची वनडे मालिका खेळणार अाहे. यामध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे मालिकेचा समावेश अाहे. या मालिकेला २ मार्चपासून सुरुवात हाेत अाहे. घरच्या मैदानावर हाेणाऱ्या या वनडे मालिकेतून भारताला विश्वचषकासाठीची शेवटची तयारी करावी लागेल. त्यामुळे या मालिकेत अव्वल कामगिरीचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. 

 

व्हीव्हीएस लक्ष्मण, अाकाश चाेपडासह काही दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी अापापल्या मतानुसार विश्वचषकासाठीचा भारतीय संघ जाहीर केला अाहे. यामध्ये १२ खेळाडूंच्या नावे निश्चित करण्यात अाली. मात्र, टीममधील उर्वरित तीन खेळाडूंच्या नावासाठी जाेरदार चर्चा अाहे. तसेच या तीन स्थानांवरील अापला प्रवेश निश्चित करण्यासाठी ११ खेळाडूंमध्ये जाेरदार शर्यत लागलेली दिसते. त्यामुळे या तीन खेळाडूंच्या नावाची घाेषणा करण्यासाठी निवड समितीला माेठी कसरत करावी लागेल. १४ जुलैपर्यंत रंगणाऱ्या विश्वचषकामध्ये खेळणाऱ्या संभाव्य भारतीय संघावरचा रिपाेर्ट. 

 

पाचव्या वेगवान गाेलंदाज वा फलंदाजाला संधी : 
संघाला पर्यायी यष्टिरक्षकाची गरज अाहे. अशात अनुभवी दिनेश कार्तिक वा ऋषभ पंत यांच्यापैकी एकालाच संधी दिली जाऊ शकेल. कार्तिकने गतवर्षी उल्लेखनीय खेळी केली अाहे. मात्र, त्याला अाॅस्ट्रेलिया अाणि न्यूझीलंडमध्ये विशेष काहीही करता अाले नाही. पंतने अाॅस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध कसाेटी मालिका गाजवली. 

 

हार्दिक पांड्याचे विश्वचषक खेळणे निश्चित मानले जाते. त्यामुळे त्याच्यानंतर अाता दुसऱ्या अष्टपैलू खेळाडूची निवड करण्याचा माेठा प्रश्न निर्माण झाला. यादरम्यान अाॅलराऊंडरच्या भूमिकेसाठी रवींद्र जडेजा वा शंकरच्या नावाची चर्चा अाहे. 

 

जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, माे. शमी अाणि हार्दिकचे विश्वचषकासाठीचे भारतीय संघातील स्थान जवळपास निश्चितच अाहे. अशात निवड समितीसमाेर पाचव्या वेगवान गाेलंदाजाच्या भूमिकेसाठी उमेश यादव, खलील अहमद अाणि सिराजचे चेहरे अाहेत. यापैकी एकाची निवड करावी लागेल. 

 

स्पर्धेपूर्वी टीम इंडिया खेळणार केवळ पाच वनडे, २ मार्चपासून अाॅस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची मालिका 

 

या १२ खेळाडूंचा संघातील सहभाग अाहे निश्चित 
फलंदाज सामने धावा शतक 
विराट कोहली २० १५०३ ०७ 
रोहित शर्मा २७ १३८४ ०६ 
शिखर धवन २७ ११४० ०३ 
अंबाती रायडू १८ ६०६ ०१ 
महेंद्र सिंह धोनी २६ ५१७ ०० 
ऑलराउंडर सामने धावा बळी 
केदार जाधव १७ २०५ ०९ 
हार्दिक पांड्या १३ १२९ ०९ 
गाेलंदाजी सामने बळी 4+ विकेट 
कुलदीप यादव २५ ५५ ५ वेळा 
युजवेंद्र चहल २३ ४४ ३ वेळा 
भुवनेश्वर कुमार २२ २६ १ वेळा 
जसप्रीत बुमराह १३ २२ १ वेळा 
मोहमंद शमी ०९ १७ 0 बार 

१ जानेवारी २०१८ पर्यंतची अाकडेवारी. 


क्रमवारी : काेहली व बुमराह अव्वल स्थानावर, धाेनीची प्रगती 
दुबई | विक्रमी मालिका विजयाने भारतीय संघाला अायसीसीच्या वनडे क्रमवारीत प्रगती साधता अाली. भारतीय संघ १२२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर अाहे. तसेच इंग्लंडचा संघ १२६ गुणांसह अव्वल स्थानावर कायम अाहे. फलंदाजी क्रमवारीमध्ये विराट काेहलीने (८७) अव्वल स्थान कायम ठेवले. यादरम्यान माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने क्रमवारीत प्रगती साधली. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत १७ वे स्थान गाठले. त्याला तीन स्थानांनी सुधारणा करता अाली. त्याने अाॅस्ट्रेलिया अाणि न्यूझीलंडमध्ये मालिकेत अव्वल कामगिरी केली. राेहित शर्मा (८५४) दुसऱ्या व न्यूझीलंडचा राॅस टेलर (८२१) तिसऱ्या स्थानावर अाहे. 


गाेलंदाजीत जसप्रीत बुमराह (८०८) अव्वल स्थानावर कायम अाहे. त्यापाठाेपाठ अफगाणच्या रशीद खानने दुसरे स्थान गाठले. 


टी-२० मालिका : जखमी मार्टिन गुप्टिल बाहेर 
दुखापतीमुळे यजमान न्यूझीलंड टीमचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गुप्टिल अाता भारताविरुद्ध टी-२० मालिकेला मुकणार अाहे. उद्या बुधवापासून या मालिकेला सुरुवात हाेईल. या मालिकेत ताे खेळू शकणार नाही. त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली अाहे. पाचव्या वनडेच्या तयारीदरम्यान त्याला ही दुखापत झाल्याची माहिती देण्यात अाली. त्यामुळे त्याच्या जागी संघात जेम्स निशामला संधी देण्यात अाली. त्याने शेवटच्या सामन्यात ४४ धावा अाणि तीन विकेट घेतल्या हाेत्या. 

बातम्या आणखी आहेत...