वर्ल्डकप / महिला संघाची घोषणा, नऊ खेळाडू 22 पेक्षा कमी वयाच्या, हरमनप्रीतकडे नेतृत्व

21 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात होईल स्पर्धा

प्रतिनिधी

Jan 13,2020 09:44:00 AM IST

मुंबई : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी रविवारी महिला संघाची घोषणा करण्यात आली. १५ सदस्यीय संघामध्ये ९ खेळाडू २२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत. १५ वर्षीय शेफाली वर्मा सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली. तिची ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल. बंगालच्या रिचा घोषलादेखील संघात स्थान मिळाले. ती विश्वचषकात पदार्पण करू शकते. टी-२० चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये रिचाने चांगले प्रदर्शन केले होते. विश्वचषकचे सामन्यास २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. विश्वचषकापूर्वी टीम ३१ जानेेवारीपासून ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका खेळेल.


यात तिसरा संघ इंग्लंड असेल. तिरंगी मालिकेसाठीदेखील १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. त्यात नुजहत परवीनला संधी मिळाली. इतर सदस्य विश्वचषकातील आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले विश्वचषकापूर्वी तिरंगी मालिका आमच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. यात आम्हाला विश्वचषकापूर्वी खेळाडूंना पारखण्याची संधी आहे.


ऑस्ट्रेलियाने ४ वेळा जिंकला किताब


महिला टी-२० वर्ल्डकपचे सातवे सत्र आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ४ वेळा हा किताब जिंकला. ते गत चॅम्पियनदेखील आहेत. इंग्लंड व वेस्ट इंडीजने एक-एक वेळा किताब जिंकला. भारतीय टीम कधीही फायनलमध्ये पोहोचली नाही. टीमने तीन वेळा (२००९, २०१०, २०१८) उपांत्य फेरी गाठली हाेती. स्पर्धा २१ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंतचालेल. अ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश ब गटात इंग्लंड, आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाक व थायलंड अाहे.


भारतीय महिला संघ

खेळाडू - वय - राज्य

हरमनप्रीत कौर - 30 - पंजाब

स्मृति मंधाना - 23 - महाराष्ट्र

शेफाली वर्मा - 15 - हरियाणा

जेमिमा रोड्रिग्ज - 19 - महाराष्ट्र

हरलीन देओल - 21 - पंजाब

दीप्ति शर्मा - 22 - उप्र

वेदा कृष्णमूर्ति - 27 - कर्नाटक

रिचा घोष - 16 - बंगाल

तानिया भाटिया - 22 - पंजाब

पूनम यादव - 28 - उप्र

राधा यादव - 19 - महाराष्ट्र

राजेश्वरी गायकवाड़ - 28 - कर्नाटक

शिखा पांडे - 30 - गोवा

पूजा वस्त्राकर - 20 - मप्र

अरुंधती रेड्‌डी - 22 - आंध्र

X
COMMENT