आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ महिन्यांपेक्षा अधिक दिवस २१ देेशांच्या ६० शहरांमधून प्रवास करून वर्ल्डकपची ट्राॅफी लंडनमध्ये झाली दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र ट्राॅफीच्या डाेमेस्टिक टूरचे आहे. आयसीसीने इंग्लंडमधील जंगलातील सफारीमध्येही ट्राॅफीची प्रवासाची माेहीम राबवली - Divya Marathi
हे छायाचित्र ट्राॅफीच्या डाेमेस्टिक टूरचे आहे. आयसीसीने इंग्लंडमधील जंगलातील सफारीमध्येही ट्राॅफीची प्रवासाची माेहीम राबवली

लंडन - गतवर्षी २७ ऑगस्टला आयसीसीच्या वनडे वर्ल्डकप ट्राॅफीच्या जगभरातील प्रवासाच्या माेहिमेला सुरुवात झाली हाेती. आता ही प्रवास माेहीम शेवटच्या टप्प्यात पाेहोचली आहे. पाच उपखंडातील २१ देशांच्या ६० शहरांमधून प्रवास करून ही ट्राॅफी यजमान इंग्लंडच्या लंडन या एेतिहासिक सिटीमध्ये दाखल झाली. येत्या तीन दिवसांच्या दरम्यान ही ट्राॅफी लंडनमधील वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणार आहे. 

 

याचदरम्यान क्रिकेटच्या थीमवर चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले. त्यानंतर ३० मे राेजी ही ट्राॅफी ओव्हलच्या मैैदानावर दाखल हाेईल. याचदरम्यान यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे. येथे इंग्लंड आणि  आफ्रिका  उद्घाटनीय सामन्याने या विश्वचषकाला सुरुवात हाेईल.

बातम्या आणखी आहेत...