आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • World Famous Luis Bridge In Portugal Was Closed For Two Days To Shoot An Action Scene In The Film 'War'

'वॉर' चित्रपटातील एक अॅक्शन सीन चित्रित करण्यासाठी पोर्तुगालमध्ये दोन दिवस बंद राहिला वर्ल्ड फेमस लुइस ब्रिज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' चित्रपटाचे शूटिंग जगातील 7 देशातील 15 शहरांमध्ये झाले. चित्रपटातील एक अॅक्शन सीन पोर्तुगालच्या पोर्टो शहरातदेखील चित्रित केला गेला. हा सीक्वेंस शूट करण्यासाठी त्या शहरातील सर्वात मोठा लुइस पुल दोन दिवस पूर्णपणे बंद केले गेला होता. 
 
दिग्दर्शक सिद्धार्थने सांगितले की, ‘‘आम्ही पोर्टोमध्ये ऋतिक-टायगर यांच्या एका अॅक्शन सीक्वेंसचे शूटिंग केले आहे. या जबरदस्त दृश्यामध्ये टायगरला ऋतिकचा पाठलाग करायचा होता आणि त्यासाठी पोर्टोमध्ये मुख्य पुल दोन दिवस बंद करण्याची गरज होती. जेणेकरून हे दृश्य चांगल्या पद्धतीने चित्रित केले जावे.’’
 

अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळाली... 
सिद्धार्थने सांगितले, ‘‘आम्हाला स्थानिक अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळाली आणि यामुळे या अॅक्शन सीक्वेंसचे शूटिंग पूर्ण होऊ शकले. यादरम्यान स्थानिक लोक खूप उत्सुक होते आणि हे पाहण्यासाठीही तेथे पोहोचले की, अखेर कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हा पुल बंद ठेवला गेला आहे.’’ 

बातम्या आणखी आहेत...