आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरुग्णालयातून बाहेर आल्यावर जग वाटते जणू दुसरे रुग्णालय; सआदत हसन मंटोंची भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंटो... पूर्ण नाव सआदत हसन मंटो. ज्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय उर्दू कथेचा विषय अपूर्ण राहील,असे आपण म्हणू शकतो. मंटो यांनी महिलांप्रति समाजाचा असणारा संकुचित दृष्टिकोन व शोषणाच्या वागणुकीवर तिखट शब्दात हल्ला चढवला होता. विशेष म्हणजे गेल्या शतकातील सुरुवातीच्या दशकातील हा काळ. जिथे कट्टर परंपरा आणि रूढी पाळण्यासाठीचा अट्टहास असे. त्या काळात मंटोंनी केलेले लिखाण जोखमीचे व धाडसाचे काम होते. प्रतिगामी लोकांनी मंटोंना कडाडून विरोध केला. त्यांच्याविरुद्ध अश्लीलतेचे खटले गुदरले. लाहोर न्यायालयात चाललेल्या या खटल्यांमुळे मंटोंना मानसिकदृष्ट्या ठेच पोहोचली. अशा वातावरणात तत्कालीन बुद्धिजीवींचा एक वर्गाही त्यांच्याविरुद्ध उभा राहिला. खटल्यांसाठीची धावपळ, तणाव, सामाजिक तिरस्कार व आतमध्ये एकटे पडल्याच्या मानसिक स्थितीमुळे ते खूप विचलित झाले. समाजिक अन्यायात मंटो नैराश्याच्या गर्तेत गेले आणि त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते. 


एक आक्रमक, खुल्या भाषेचा हा लेखक मनाजोगे जीवन जगला. त्यांच्या आयुष्याची मद्य, स्त्री, रोखठोक बोलण्याची एक बाजू असली तरी त्यांनी आपल्या लेखनात खूप सजगता, गांभीर्य व शब्दाप्रती जबाबदारी सांभाळली. आपल्या अखेरच्या काळात एका प्रकाशकासाठी एक बाटली मद्याच्या बदल्यात रोज एक कथा लिहिणाऱ्या मंटोंनी लेखन साहित्याचा स्तर कधी कमी होऊ दिला नाही. प्रत्येक कथा एवढ्या कमी वेळेत लिहिली जायची असे नव्हते. ते यासंदर्भात म्हणत, 'स्वराज्य के लिए' मुंबईतील फिल्मिस्तान स्टुडिओतील नोकरीदरम्यान लिहिली होती. ती अनेक महिन्यांत पूर्ण केली होती. 


मंटो यांच्या लेखनाची सुरुवात अनुवादकाच्या रूपात झाली. त्यांनी रशियन कथांचा अनुवाद केला. मात्र,हे अनुवाद कुठे प्रकाशित होऊ शकले नाहीत. मंटोंनी समाज बाहेरून नव्हे, तर खोल आत पाहिला व जगला. त्यामुळेच त्यांच्या कथांतून वज्राघात व्यक्त झाला. उपेंद्रनाथ अश्क यांनी आपल्या एका लेखात लिहिले होते की,'मंटो उतने बद नही थे, जितने बदनाम थे।' अश्क व यशपाल यांनीही मंटोंच्या कथांवरून खटले चालले त्यांना अश्लील मानले नाही. उलट त्यावर म्हटले होते की, या कथा मानवी संवेदना आहेत. उलट त्या मनाला क्रुद्ध करतात, मात्र अश्लीलतेला स्पर्शही करत नाहीत. 


तारुण्यावस्थेतील दीर्घ काळ मद्यालय, वेश्यालय, मित्र, रुग्णालयापासून कोर्ट-कचेरी, खटले आणि वेड्यांच्या रुग्णालयात गेला मात्र, यादरम्यान त्यांनी निर्माण केलेली साहित्यकृती उर्दू साहित्यातील मैलाचा दगड ठरली आहे. असे असले तरी कट्टरपंथीय मुल्ला-मौलवी, राजकारणी, सत्ताधाऱ्यांना त्यांचे लेखन रुचले नाही. याबाबत मंटोंनी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. वेड्याच्या इस्पितळातून परतल्यावर त्यांनी म्हटले होते, एका वेड्याच्या रुग्णालयातून बाहेर येऊन दुसऱ्या वेड्याच्या इस्पितळात आलो आहे. 


'पंडितजी, मेरे इस खत से जले हुए गोश्त की बू आएगी'- देशाचे विभाजन व त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मंटोंना धक्का बसला होता. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, तुम्हाला माझ्या या पत्रातून जळालेल्या मांसाचा वास येईल.(भालचंद्र जोशी मंटो यांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत.) 


जन्म : ११ मे १९१२ 
(समराला गाव, पंजाब) 
निधन : १८ जानेवारी १९५५ (४३ वर्षे) 
साहित्य संपदा : २३ हून जास्त कथासंग्रह प्रकाशित. 
चर्चेत का? : त्यांच्यावरील मंटो चित्रपट. 


साहित्याविषयी... 
- पहिली कथा 'तमाशा' साप्ताहिक खल्क, अमृतसरमध्ये प्रकाशित. 
- पहिला कथासंग्रह 'चिंगारियाँ' १९३५ मध्ये प्रकाशित. 
- शेवटची 'कबूतर और कबुतरी' 
- काली शलवार, बू, ठंडा गोश्त, धुआं, खोल दो आणि ऊपर, नीचे और दरमियान कथांवर खटले चालले. 
गौतम चक्रवर्ती 

बातम्या आणखी आहेत...