आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 30 सेकंदांत टेस्टिकल कॅन्सरचे निदान करणारे रोबोटिक यंत्र; कृत्रिम हाताने करणार तपास, न्यूझीलंडमध्ये लाँच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑकलंड - न्यूझीलंडमध्ये अंडकोषाचा (टेस्टिकल) कॅन्सरचे निदान करण्यासाठी प्रथमच रोबोटिक यंत्र तयार करण्यात आले. याला टेस्टिमॅटिक यंत्राचे नाव देण्यात आले आहे. देशातील अनेक शहरांत ही यंत्रे बूथप्रमाणे बसवण्यात येत आहेत. टेस्टिकल कॅन्सर न्यूझीलंडच्या मते अशा प्रकारच्या कॅन्सरची 90 टक्के केसेस यशस्वी ठरल्या आहेत. या आजारात टेस्टिकल्समध्ये कोठेही न दुखता सूज येते. त्याचा आकार बदलतो. 


रुग्णांची आर्टिफिशियल हाताने तपासणी 
- ब्रिटनमध्ये दरवर्षी 2200 पुरुषांच्या टेस्टिकल्स कॅन्सरवर उपचार केले जातात. इंग्लंडमधील अभ्यासानुसार, टेस्टिकल कॅन्सरचे प्रमाण आशियाई पुरुषांपेक्षा युरोपीय पुरुषात जास्त असते. त्याचबरोबर अंडकोष कॅन्सर साधारणत: 15 ते 45 वयोगटातील पुरुषांत असतो. या यंत्रास ऑकलंडच्या एका एक्स्पोतील बिग बॉय टॉइज सेक्शनमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. तेथे या मशीनला चांगला प्रतिसाद मिळाला. 
- यंत्र तयार करण्याचा उद्देश लोकांमध्ये टेस्टिकल कॅन्सरबाबत जागृती निर्माण करायची आहे. रुग्णास कोठेही उभे राहून तपासणी करता यावी, यासाठी पडदे बसवले आहेत. रुग्णांच्या टेस्टिकल्स तपासणीसाठी एक कृत्रिम हात असून रुग्णास कोणताही त्रास होत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. सोबतच अवघ्या 30 सेकंदांत निकाल समोर येतो.

 

बातम्या आणखी आहेत...