Home | International | Other Country | world hottest fish seller in taiwan, mother reveals her emotional journey

फक्त देखणीच नाही, तर मनानेही तेवढीच सुंदर आहे ही मच्छीवाली, कारण कळताच तुम्हीही म्हणाला ग्रेट!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 16, 2018, 03:27 PM IST

तरुणीच्या आईने खुलासा केला तेव्हा सर्वांना धक्का बसला.

 • world hottest fish seller in taiwan, mother reveals her emotional journey

  तायपेई - अवघ्या काही दिवसांपूर्वी तैवानमध्ये धूमाकूळ घालणाऱ्या मटनवालीनंतर आता याच देशातील मच्छीवाली जगभरात व्हायरल होत आहे. लिउ वेई (26) असे या तरुणीचे नाव असून ती एक मॉडेल आहे. फिश मार्केटमध्ये फेरफाटका मारणाऱ्या एका तरुणाची नजर या मॉडेलवर गेली. कित्येक जाहिराती आणि फलकांमध्ये दिसणारी ही तरुणी अचानक मच्छीमार्केटमध्ये काय करते असा प्रश्न त्याला पडला. त्याने वेळीच लिउचे फोटोज क्लिक करून सोशल मीडियावर पोस्ट केली. ती पोस्ट इतकी व्हायरल झाली, की लिउला आपल्या फेसबुकवर प्रतिक्रिया द्यावी लागली. तिने फेसबुकवर लिहिले की उद्या मी पुन्हा मच्छी विकणार आहे. यानंतरच तिने यामागच्या कारणांचा खुलासा केला.


  येथेच झाली लहानाची मोठी... मच्छीवालीची मुलगी बनली मॉडेल...​

  - सोशल मीडियावर वाढत्या मागणीनंतर लिउने पुन्हा मच्छी विकण्याचे आश्वासन पूर्ण केले. याच आठवड्यात गुरुवारी (6 डिसेंबर) ती मासे विकताना दिसून आली. तिच्याकडून खरेदी करण्यासाठी लोकांनी अक्षरशः रांगा लावल्या. लोकांनी फोटो घेण्यासाठी गर्दी केली. त्यात चिनी माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा कॅमेरे आणि बूम घेऊन मार्केटमध्ये पोहोचले. यानंतर तिने काही बोलण्यास नकार दिला. मग, फिश स्टॉलच्या मालकीनीने यामागचे खरे कारण उलगडले.
  - महिला म्हणाली की ती माझी मुलगी आहे. फिश मार्केटमध्ये लिउ मासे विकत असल्याची ही पहिली वेळ नाही. हे दुकान तिचे आणि तिच्या मुलीचेच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिने याच ठिकाणी मासे विकून आपल्या मुलीला शिकवले आणि मॉडेल बनवले. मुलगी प्रसिद्ध झाली. अनेक मॉडेलिंगचे प्रोजेक्ट देखील घेतले. परंतु, वेळ मिळाल्यास ती घरी येते आणि आपल्या आईची मदत करते. फरक एवढाच की यावेळी सोशल मीडियावर तिला प्रसिद्धी मिळाली. कितीही मोठ्या शहरात गेली तरी तिच्या मुलीची नाळ तिच्या गावाशी घट्ट जुळलेली आहे.

 • world hottest fish seller in taiwan, mother reveals her emotional journey
 • world hottest fish seller in taiwan, mother reveals her emotional journey
 • world hottest fish seller in taiwan, mother reveals her emotional journey
 • world hottest fish seller in taiwan, mother reveals her emotional journey

Trending