आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदी हिंदू राष्ट्रवादाचा राजकीय ब्रँड' तर 'मोदींवर देशाचे तुकडे करण्याचा आरोप पण लोकांची त्यांनाच पसंती' अशी आहे वर्ल्ड मीडियाची लोकसभा निकालावर प्रतिक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयामागे मोदींवरील जनतेचा विश्वास हे कारण असल्याचे जागतिक मीडियाचे सांगितले आहे. ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने लिहिले की, मोदींच्या भाजपाने पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. अमेरिकेच्या 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने लिहिले की, मोदी आपल्या मजबूत प्रतिमेमुळे जिंकले आहे. भाजपच्या या मोठ्या नेत्याला रोखणे विरोधी पक्षासाठी कठीण झाले आहे. तर पाकिस्तानच्या 'द डॉन'ने लिहिले की, मोदींचा हा विजय पाकिस्तान विरोधी धोरणावरील शिक्का आहे. 


मोदी हा हिंदू राष्ट्रवादाचा राजकीय ब्रँड -  द न्यूयॉर्क टाइम्स

लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर द न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले की, 'काही महिन्यांपूर्वी मोदी आर्थिक आघाडीवर लढत होते, तेव्हा विश्लेषकांनी जो विचार केला..त्यापेक्षा हा विजय अधिक प्रभावी असणार आहे. हिंदू राष्ट्रवादाचा राजकीय ब्रँड ठरलेले मोदींनी संपूर्ण जगात भारताची मजबूत प्रतिमा सादर करण्याचा प्रयत्न केला होता. मोदीने देशातील 91 कोटी मतदारांना पूर्णपणे प्रभावित केले. मोदींना व्यापारासाठी देखील चांगले मानले गेले. त्यांनी टॅक्स व्यवस्थेला सोपे करत भ्रष्टाचारावर लगाम लावला. भारतातील स्टॉक मार्केट आशियातील एक संभाव्य स्थान आहे. तर अमेरिकेच्या व्यापार युद्धामुळे चीनच्या शेअर बाजारात नुकसान सहन करावे लागले.'

 

एक्झिट पोलचा निकालच खरा ठरला - द गार्डियन 
द गार्डियनने लिहिले की, एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आलेला निकालच खरा ठराल. मोदींची भाजपा पुन्हा सत्तास्थापनेसाठी तयार आहे. मोदींनी रोखण्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले पण जनतेने या दमदार नेत्यावर आणि त्याच्या पार्टीवर आपला विश्वास कायम ठेवला. 

 

मोदींवर देशाचे तुकडे करण्याचे आरोप पण लोकांची त्यांनाच पसंती - बीबीसी
बीबीसी वर्ल्डने सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मोदींची ऐतिहासिक विजय झाला. निकालाचा कल समोर येताच स्टॉक मार्केटमध्ये उसळी पाहण्यास मिळाली. मोदीवर भारताचे तुकडे करण्याच आरोप करण्यात आले पण परिणाम दाखवत आहेत की, त्यांच्या ध्रुवीकरण प्रतिमेला लोकांनी पसंत केले आहे. 

 

मोदींना भारतातच नाही तर संपूर्ण जगात गंभीरतेने घेतले जाते - सीएनएन
सीएनएनने लिहिले की, गेल्या वेळी 'सबका साथ-सबका विकास' हा मोदींचा नारा होता. तर यावेळी त्यांनी स्वतःला चौकीदार संबोधले होते. त्यांनी स्वतःला या देशाचा रक्षक असल्याचे दर्शवले. हा एक वेगळाच संदेश देण्यात आला. 2014 मध्ये अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या आश्वासनांनी मोदींना लोकप्रिय बनवले. यामुळेच मोदींना फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात गंभीरतेने घेतले जाते.

 

पुलवामाचा भाजपला फायदा मिळाला - जियो टीव्ही
पाकिस्तानी चॅनल जियो टीव्हीने आपल्या वेबसाइटवर लिहिले की, 'मोदी प्रचाराच्या सुरुवातीला काही विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि काही राज्यांतील महागाई-बेरोजगारी वरील जनेतेच्या रोषामुळे दबावात होते. पण पुलवामा हल्ल्यानंतर हे अभियान शेजारील देश पाकिस्तानवर वळवले. यामध्ये भाजपला फायदा झाला. भाजपाने मोदींच्या स्टारडमचा फायदा घेतला. भाजपची निवडणूक यंत्रणा ही तळागाळापर्यंत अधिक प्रभावी होती.'

 

मोदी इम्रान यांच्या शांतता प्रस्तावाकडे लक्ष देणार का? - डॉन
द डॉनने लिहिले की, सध्या मतमोजणीत पुढे दिसत आहेत. यावरून असे दिसून येते की, भाजपची पाकिस्तान प्रती असलेली निती बदलणार नाही आणि दोन्ही देशांतील तणाव कमी होणार नाही. आता मोदी इम्रान खान यांच्या शांती प्रस्तावाकडे लक्ष देतील का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...