आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो - जपानमध्ये मार्च २०११ च्या सुनामीत असंख्य घरे-इमारतींसह ७० हजारांवर झाडे उन्मळून पडली होती. परंतु रिकुजेन्ताकाता भागातील एक झाड सुरक्षित राहिले होते. स्थानिक लोक हा चमत्कार मानतात. मदतकार्य पूर्ण झाल्यानंतर या पाइनची देखभाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्याच्याभोवती सुरक्षेसाठी लोखंडाचे कुंपण लावण्यात आले.
त्यामुळे झाडावर यंत्राचा काही प्रभाव पडणार नाही. तज्ज्ञांनी २७ मीटर उंच या झाडाची मुळे व साल यांचा अभ्यास केला. हे झाड सुमारे २५० वर्षे जुने आहे. त्यात वादळाचा मुकाबला करण्यासारखे कोणते गुणधर्म आहेत, हे त्यांना जाणून घ्यायचे होते. झाडाला सुरक्षित करण्याच्या प्रकल्पावर सुमारे ९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परिसरातील लोकांनी देश तसेच परदेशातून त्यासाठी आर्थिक मदत मागवली. आजही लोक कुतूहलाने हे झाड पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
- ११ मार्च २०११ रोजी जपानच्या आेशिकोपासून ७० किमीवर ९ तीव्रतेचा भूकंपाचा तडाखा बसला होता. भूकंपाचे केंद्र २४ किमी खोल होते. २० मिनिटांनंतर सुनामीचा फटका होककाइदो व दक्षिणेकडे आेकिनावा बेटावर धडकून ते उद्ध्वस्त झाले होते.
-१५ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू. त्यानंतर सुनामीच्या विशाल लाटा फुकुशिमा दाइच अण्वस्त्र संयंत्रावर धडकल्या. त्यामुळे संयंत्र वितळू लागले व स्फोट झाले. या विध्वंसात १५ हजार ८९४ जणांचा मृत्यू झाला. २५०० हून जास्त लोक बेपत्ता आहेत.
- १.२० लाखाहून जास्त इमारती वाहून गेल्या. सुमारे २.७८ लाख घरांची हानी झाली होती व ७.२६ लाख इमारतींचे अंशत: नुकसान झाले. नैसर्गिक संकटात २३५ अब्ज डॉलरचे नुकसान झाले. इतिहासातील ही सर्वाधिक हानी मानली जाते.
पुढील स्लाइडवर पाहा, सुनामीमध्ये रिकुजेन्ताकाता भागात वाचलेले एकमेव झाड...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.