आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • World Television Day, First Television Made Of Biscuit Tin, Sewing, Cardboard And Fan Motor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज टीव्ही झाला 95 वर्षांचा, 1924 मध्ये कार्डबोर्ड आणि पंख्याच्या मोटारीपासून तयार झाला होता जगातील पहिला टीव्ही   

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात 80 च्या दशकात रंगीत टीव्हीची क्रेज इथकी वाढली की, लोक दुप्पट किमतीथ खरेदी करायला तायर होते
  • 1950 मध्ये वायर्ड रिमोट कंट्रोल असलेला टीव्ही बाजारात आला, 1955 मध्ये वायरलेस रिमोटचा टीव्ही आला
  • 1954 मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर न्यूज बुलेटिन सुरू झाले, अँकरऐवजी फक्त फोटो दिसायचा

गॅजेट डेस्क- आज वर्ल्ड टेलीविजन डे आहे. आपल्या सर्वांच्या घरात असलेला टीव्ही आज 95 वर्षांचा झाला आहे. टीव्हीचा प्रवास भलेही 95 वर्षे जुना असेल, पण आज हाच आपल्यापेक्षा मॉडर्न अवतारात आहे. 9 दशकांपूर्वी मोठ्या डब्ब्यात येणारा हा इडियट बॉक्स आज आपण आपल्या आवाजावर ऑपरेट करू शकतो. 1924 मध्ये बॉक्स, कार्ड आणि पंख्याच्या मोटरीने टीव्ही तयार झाला होता. या मोठ्या बॉक्सपासून आता स्लिम पीस टीव्हीपर्यंतचा प्रवास जितका लांब आहे, तेवढाच हा रंजक आहे. रेडिओच्या काळात टीव्हीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. पण, नंतर काळ बदलला तसा लोकांना याबद्दल आकर्षण वाढू लागले आणि 1962 मध्ये 41 टीव्ही सेट आणि एक चॅनलपासून टीव्हीची सुरुवात झाली. 1995 पर्यंत भारतात 7 कोटी लोकांच्या घरात टीव्ही होता.भारतात कलर टीव्ही 1982 मध्ये आला. त्यावेळेस 8 हजार रुपये किंमत असलेला हा टीव्ही लोक 15 हजार रुपयालादेखील विकत घ्यायला तयार होते. टीव्हीची वाढती मागणी पाहता, सरकारने परदेशातून 50 हजार टीव्ही सेट आयात केले. संयुक्त राष्ट्रात सर्वात आधी वर्ल्ड टेलीविजन डे 21 नोव्हेंबर 1997 ला साजरा करण्यात आला. आज वर्ल्ड टीव्ही डे आहे, त्यानिमित्त जाणून घेऊया टीव्हीबद्दल काही रंजक किस्से...

1955 मध्ये वायरलेस रिमोट असलेला पहिला टीव्ही आला होता


> टीव्हीचा शोध "जॉन लोगी बेयर्ड" यांनी केला आहे. ते लहान असताना आजारपणामुळे शाळेत जाऊ शकत नव्हते. 13 ऑगस्ट 1888 ला स्कॉटलँडमध्ये जन्म झालेले बेयर्डमध्ये टीव्हीबद्दल इतके आकर्षण होते की, 12 वर्षांचे असताना त्यांनी आपला टेलीफोन तयार केला होता. बेयर्ड यांना वाटायचा की, भविष्यात एक दिवस असा येईल की लोक हवेतून माहितीची देवाण घेवाण करू शकतील. बेयर्डने 1924 मध्ये बॉक्स, बिस्किटचे टिन, शिलाई मशीनची सुई, कार्ड आणि विजेवर चालणाऱ्या पंख्याच्या मोटारीपासून पहिला टीव्ही बनवला होता.> टेलीव्हीजनच्या रिमोट कंट्रोलचा शोध "यूजीन पोली"ने केला. यूजीन पोलीचा जन्म 1915 मध्ये शिकागोत झाला होता. ते जेनिथ इलेक्ट्रॉनिकमध्ये काम करत होते. 1950 मध्ये रिमोट कंट्रोल असलेला पहिला टीव्ही बाजारात आला, हा टीव्ही एका तारेने टीव्हीला जोडला होता. त्यानंतर 1955 मध्ये वायरलेस रिमोट कंट्रोल असलेला टीव्ही आला.पहिली जाहिरात- कंपनीने 10 सेकंदासाठी मोजली 9 डॉलर किंमत


> जगातील पहिली टीव्ही जाहिरात 1 जुलै 1941 ला अमेरिकेत प्रसारित झाली होती. ही जाहिरात घड्याळ बनवणारी कंपनी बुलोवा (Bulova) ने दिली होती. या जाहिरातीला एका बेसबॉल सामन्यापूर्वी डब्ल्यूएनबीटी चॅनलवर प्रसारित केली होती. 10 सेकंदांच्या या जाहिरातीसाठी बुलोवाने 9 डॉलर किंमत मोजली होती.पहिला कलर टीव्ही- फक्त 500 युनिट तयार केले होते, किंमत 6200 रुपये
 
मार्च 1954 मध्ये वेस्टिंगहाउसने पहिला कलर टीव्ही सेट बनवला होता. सुरुवातील याचे फक्त 500 यूनिट्स तयार केले होते. त्यावेळेस सामान्य लोकांना न परवडणाऱ्या किमतीत म्हणजेच, 6,200 रुपयांना विकल्या गेले होते. त्याच्या काही काळानंतर अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आरसीएने कलर टीव्ही CT-100 ला बनवले होते, किंमत अंदाजे 5 हजार रुपये होती. कंपनीने याचे 4 हजार यूनिट तयार केले होते. त्यानंतर अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रॉनिक्सने अपला 15 इंच स्क्रीन असलेला कलर टीव्ही बाजारात आणला, त्याची किंमत 5 हजार रुपये होती.

भारतातील पहिला टीव्हीचा ग्राहक- कोलकातातील नियोगी कुटुंब
 
इलेक्ट्रिक इंजीनियरिंगचे विद्यार्थी बी शिवाकुमारनने चेन्नईमध्ये झालेल्या एका एग्जीबिशनमध्ये पहिल्यांदा टीव्ही सादर केला होता. को एर कॅथोड-रे ट्यूब असलेला टीव्ही होता. त्याच्यातून ब्रॉडकास्ट करता येत नव्हते, पण याला भारतातील पहिला टीव्ही अशी ओळख मिळाली. या टीव्हीला कोलकत्तामधील श्रीमंत नियोगी कुटुंबाने खरेदी केले होते.  लोकप्रिय कार्यक्रम लागल्यावर भारतात कर्फ्यूसारखे वातावरण असायचे
 
> भारतात टेलीव्हीजनच्या इतिहासाची गोष्ट दुरदर्शनपासून सुरू होते. दुरदर्शनची स्थापना 15 सप्टेंबर 1959 ला झाली. भलेही आज टीव्हीवर हजारो चॅनल्स आहेत, पण त्यावेळेस दुरदर्शने जितकी लोकप्रियता कमवली, तितकी आज मिळवणे कठीण आहे. दुरदर्शनचे नाव सुरुवातील 'टेलीव्हीजन इंडिया' होते. 1975 मध्ये याचे हिंदी नामकरण 'दूरदर्शन' असे झाले. सुरुवातील दुरदर्शनवर आठवड्यातून दोनच दिवस अर्ध्या तासांचे कार्यक्रम असायचे. पण, नंतर त्याला आठवड्याभरासाठी केले.> 1959 मध्ये सुरू झालेल्या दुरदर्शनवर 1965 पासून दररोज प्रसारण सुरू झाले. 1986 मध्ये सुरू झालेले रामायण आणि महाभारत सारखे कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांमध्ये इतका उत्साह असायचा की, रविवारी या कार्यक्रमादरम्यान रस्त्यांवर कर्फ्यूसारखी परिस्थिती बनायची. 

पहिले न्यूज बुलेटिन 1954 मध्ये बीबीसीने सुरू केले
 
> 5 जुलै 1954 मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशन (बीबीसी) ने पहिल्यांदा टेलीव्हीजनवर डेली न्यूज बुलेटिनचे प्रसारण सुरू केले. त्यावेळेस टीव्हीवर अँकरऐवजी फक्त फोटो दिसायचा आणी आवाज ऐकू यायची. त्यावेळेस 20 मिनीटांच्या बुलेटीनला "रिचर्ड बैकर"ने वाचले होते. त्याच्या 3 वर्षानंतर टीव्हीवर अँकर असलेला कार्यक्रम सुरू झाला. त्यातही बॅकर यांनाच संधी मिळाली.

अशी आहे 95 वर्षीय टेलिव्हीजनची रंजक गोष्ट....