आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World War II Bomb Was Removed From Venice; 3500 People Taken To Safer Place, Aircraft And Train Service Also Halted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेनिसमध्ये आढळलेला द्वितीय महायुद्धातील बॉम्ब हटवला; त्यापूर्वी 3500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेz

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्को पोलो एअरपोर्टवरुन 8 तासांसाठी विमान सेवा बंद करण्यात आल्या
  • सीवर लाइनचे काम करत असताना खोदकामात हा 225 किलोचा बॉम्ब आढळला होता

रोम- वेनिसमध्ये सापडलेला द्वितीय महायुद्धातील एक बॉम्ब रविवारी शहरातून हटवण्यात आला. या बॉम्बला डिफ्यूज करुन समुद्रात सोडण्यात आला आहे. यासाठी मार्गेरा पोर्टजवळील 3,500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी बॉम्ब डिफ्यूज करेपर्यंत सुरक्षेसाठी बोट, ट्रेन आणि बस सेवा बंद केल्या होत्या. मार्को पोलो एअरपोर्टवरुन जाणारे विमानही 8 तासांसाठी बंद केले होते.


जानेवारीला सीवर लाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना खोदकामात हा बॉम्ब सापडला होता. या बॉम्बचे बजन 225 किलो होते. या बॉम्बमध्ये अंदाजे 129 किलो दारुगोळा भरला होता.

दोन टप्प्यात चालवले ऑपरेशन

बॉम्ब हटवण्याच्या कामात असलेल्या सेना रेजिमेंटचे कमांडर गियालुसा डेल्लो मोनैको यांनी सांगितल्यानुसार, नागरिकांची सुरक्षा करणे खूप महत्वाचे होते. बॉम्ब खूप जुना होता, पण यात विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याला बोटीने समुद्रात नेणेदेखील कठीण होते. रविवारी सकाळी दोन टप्प्यात हे ऑपरेशन पार पडले. आधी सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, त्यानंतर बॉम्ब डिफ्यूज करण्यात आला.